Udayanraje Bhosale Sakal
सातारा

...अन् उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला!

उदयनराजेंच्या या कार्यकर्त्यांवरच्या प्रेमाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

उदयनराजे भोसले आपल्या खास अंदाजामुळे कायमच चर्चेत येत असतात. कधी कॉलर उडवणं, कधी दुचाकीवर फिरणं यामुळं ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. आत्ताही त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते काय वेगळं करतायत? बघूयात...

भाजपा खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यातल्या गोडोली भागातल्या आपल्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी गेले होते. विनोद मोरे नावाच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. यावेळी त्यांनी मोरे यांचं कौतुक करत त्यांना पेढा भरवला.

आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांवरच्या प्रेमापोटी हे करतातच. पण हातानं नव्हे, चक्क तोंडाने उदयनराजेंनी या कार्यकर्त्याला पेढा भरवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावरुन उदयनराजेंचं चांगलंच कौतुक केल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT