सातारा

मोकाशी दांपत्याची पक्षांशी दुनियादारी, कऱ्हाडात भरते चिमण्यांची शाळा भारी!

मुकुंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) : श्री गजानन हाउसिंग सोसायटी-गोवारे-कऱ्हाड येथील सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ आकाराम मोकाशी (वय 82) यांच्या घराच्या दारात रोज चिमण्यांची शाळा भरते. रोज मोकाशी सरांची आगळी वेगळी भरणारी चिमण्यांची शाळा परिसरात लोकांचा आकर्षणाचा आणि कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. तेथे जमणाऱ्या चिमण्यांचा चिव-चिवाट पाहणाऱ्या लोकांना आनंद व विरंगुळा मिळतो. 

सोसायटीतील मोकाशी सर व त्यांच्या सुविद्य पत्नी छाया यांच्या देवदत्त घरासभोवती भरपूर शेती व झाडे असल्याने आणि हिरवळ, पाणी असल्याने येणाऱ्या चिमण्या व इतर छोट्या पक्ष्यांना अनुकुलता व सुरक्षितता आणि शांत वातावरण वाटत आहे. त्यांनी दारात येणाऱ्या छोट्या पक्ष्यांची काळजी घेत आपलेसे केले आहे. पक्ष्यांसाठी शिजवलेले अन्न आणि धान्याचा व पाण्याची सोय केली. रोज सकाळपासून चिमण्या व लहान पक्ष्यांचे थवे गेल्या दहा वर्षांपासून अव्याहत त्यांच्या दारात येत असतात. 

घराजवळून जाणारी माणसे तेथे थांबून जमलेल्या चिमण्या व पक्ष्यांना पाहून आनंद घेतात. चिमण्यांची भरलेली जत्रा पाहून अचंबित होतात. तेथे रोज पन्नास ते साठच्यावर काळ्या तोंडाच्या व पिवळसर पाठीच्या, पांढरा व लालभडक रंगाच्या विविध चिमण्या तसेच भालगुराम, होला आदींचा घराच्या दारात वावर असतो. दरम्यान, आमच्या घरीदारी येणारे छोटे पक्षी, चिमण्या पाहून आम्हासह लोकांना आनंद व समाधान मिळते. दुःख व मानसिक ताण कमी होतो. निसर्गाशी, झाडे, पक्षी यांच्याशी मैत्री व प्रेम करा, त्यामुळे जगण्याचे बळ व ऊर्जा मिळते, असे मोकाशी दांपत्य सर्वांना सांगत असते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Rainfall Record Scam : पावसाच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करून 15 कोटींचे नुकसान? माजी खासदाराच्या 'त्या' आरोपाने कृषी विभागात खळबळ, 'स्कायमेट'ला धाडली नोटीस

TCS Company Case : निदा खानच्या कुटुंबीयांची चौकशी; संशयितांना मदतप्रकरणी ‘बडा नेता’ही चौकशीच्या रडारवर

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

Indapur GP Reservation Draw: इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत १२ जूनला; आगामी निवडणुकांचे बिगुल

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे शतक! भारताचा थरारक विजय, श्रीलंकेने हातचा सामना गमावला; आगरकरच्या उपस्थितीत पोरं चमकले

SCROLL FOR NEXT