Sharad Pawar  esakal
सातारा

Sharad Pawar Resign : शरद पवारांचा निर्णय सर्वांच्याच जीवाला चटका लावणारा; बाळासाहेब पाटील

राजकारणाबरोबर समाजातील सर्व घटकांशी त्यांचे संबंध

हेमंत पवार

कऱ्हाड : जेष्ठ नेते शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे. देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हा दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल. या निर्णयापासून त्यांनी परावृत्त व्हावे यासाठी मागणी करण्यात आली असुन त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीव्दारे त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

जेष्ठ नेते पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रतिक्रीया देताना आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, जेष्ठ नेते पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत होते. त्या कार्यक्रमातील समारोपाच्या भाषणात पवार साहेबांनी पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नेते, कार्यकर्ते आवाक झाले. त्यानंतर सर्वांनीच पक्षीय राजकारणातुन निवृत्ती घेवु नये.

दीड तास लोकांची घोषणाबाजी सुरु होती. त्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवार साहेब घरी जात आहेत. सायंकाळी आम्ही प्रमुख मंडळी जावुन त्यांची भेट घेणार आहोत, असे सांगीतले. दरम्यानच्या काळात तेथे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र त्यावर काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हा दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल. गेली ५५ ते ६० वर्षे राज्याच्या व देशाच्या राजकारणात साहेब सक्रीय आहेत.

राजकारणाबरोबर समाजातील सर्व घटकांशी त्यांचे संबंध राहिले आहेत. एखादी व्यक्ती आल्यावर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहुन त्यांना न्याय देण्याची पवार साहेबांची अनोखी पध्दत आहे. सर्वांच्याच जीवाला चटका लावणारा हा निर्णय झालेला आहे. या निर्णयापासुन त्यांना परावृत्त करण्यासाठी मागणी करण्यात आली असुन त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीव्दारे त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT