Shashikant Waikar esakal
सातारा

भाजप आमदाराची साथ सोडताच, वाईकरांना मिळालं NCP चं 'अध्यक्षपद'

उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या (Satara-Jawali Assembly constituency) अध्यक्षपदी परळी खोऱ्यातील युवक नेते शशिकांत वाईकर (Shashikant Waikar) यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निवडीची घोषणा गुरुवारी मुंबईमध्ये केली.

शशिकांत वाईकर यांनी चारच दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शशिकांत वाईकर यांनी प्रथमच अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व माहिती दिली. या वेळी अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात गावोगावी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या वेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.

दरम्यान, शशिकांत वाईकर यांनी चारच दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम परळी येथे मोठ्या दिमाखात झाला होता. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, तसेच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT