सातारा

'याच' वेळी साेडा काेयना धरणातील पाणी : गृहराज्यमंत्र्यांची सूचना

हेमंत पवार

कऱ्हाड : कोयना धरणात 77.18 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरणासह पाटण तालुक्यातील कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणी साठाही मुबलक झाला आहे. पाटण तालुक्यातील धरणे किंवा मध्यम धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ आलीच तर त्याची पुर्वकल्पना देवून धरणातील पाणी दिवसाचे सोडावे. रात्री नागरीक बेसावध असताना कोणत्याही धरणातील पाणी सोडू नये, अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील सर्व धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला दिले.
आपत्कालीन परिस्थितीत धावला वाईतील जैन समाज 

मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसील कार्यालयात पाटण तालुक्यातील कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पात झालेला पाणी साठयासंदर्भात व पुढील नियोजनाच्या अनुषंगाने आज (गुरुवार) बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयनानगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एस.भावीकट्टी, कोयना धरण तसेच कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पाच्या व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते. 

मांढरदेव घाटात दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प 

मंत्री देसाई म्हणाले, कोयना धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन धरण व्यवस्थापनाने योग्य करावे. मागीलवर्षी आजच्या तारखेला जेवढा पाणीसाठा हवा होता तो यावेळी नाही. आज (गुरुवार) धरणात 77.18 टीएमसी पाणीसाठा आहे. महाबळेश्वर, नवजा येथे मोठया प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याची चांगली आवक होते. मात्र याचठिकाणी पावसाचे प्रमाण कमी यंदा कमी आहे. प्रतिवर्षी सरासरी 15 ऑगस्टपर्यंत कोयना धरणामध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होतो. मात्र यावेळी ती शक्यता कमी आहे. मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोयना धरणातून, इतर मध्यम धरण प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठया प्रमाणातील पाण्यामुळे आणि ओढया नाल्यानांही पावसाचे जादा पाणी आल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली. सुर्दैवाने यंदा ही परिस्थिती नाही. 

महापुरातील पत्रकारिता : 'ईद के दिन ही बारीशने हमारा बच्चा छीना'; उमरच्या आईचे अश्रृ थांबेना...

धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर पाणी सोडण्याची पुर्वकल्पना लोकप्रतिनिधी व नागरिकांना दयावी. धरणातील पाणी रात्रीचे न सोडता ते दिवसाचे सोडावे. दिवसाचे पाणी सोडले तर किती प्रमाणात पाणी नदीला येणार आहे याचा अंदाज येतो व दळणवळण असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भाने इतर उपाययोजना करताना नियोजन करता येते.
Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT