ShivendraRaje Bhonsle sakal
सातारा

Satara News : गुंड प्रवृत्तीच्या टोल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची अधिवेशनात मागणी

अधिवेशनात मागणी; स्थानिकांना टोलमाफी द्यावी

सकाळ डिजिटल टीम

सातारा - गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्ह्यातील टोलनाके ताब्यात घेतले असून, केवळ कंपन्यांच्या नावावर टोलनाका घेऊन गुंडांच्या माध्यमातून टोल वसुली केली जात आहे.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील अनेकजण टोलनाक्यावर कार्यरत असून, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा, यासाठी टोल कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिवेशनात केली.

दरम्यान, स्थानिकांना टोलमाफी असतानाही आनेवाडी, तासवडे तसेच पुणे जिल्ह्यातील खेड- शिवापूर टोलनाका येथे स्थानिकांना टोलमाफी दिली जात नसल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोलनाक्यावरील वसुलीच्या संदर्भात सभागृहात आक्रमक भूमिका घेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर कोणत्याही सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत. गर्दीच्या वेळेस वाहनांसाठी टोलनाका व्यवस्थापन त्यांच्या हितासाठी एक वेगळी लेन ठेवतात.

त्या लेनच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा रेकॉर्डवर येत नाही. त्यामुळे एनएचएआयचे रस्ते आहेत, हे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटला जात आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’

टोलनाका परिसरातील ठराविक अंतरातील स्थानिकांना टोलमाफी दिली गेली आहे; परंतु त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जात नाही.

जिल्ह्यातील तासवडे, आनेवाडी तसेच पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाका येथे स्थानिकांना टोलमाफी दिली जात नाही. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी टोलनाक्यावर किती पैसे गोळा केले जातात, याची माहिती पटलावर ठेवली जाईल, तसेच गुन्हे दाखल असलेल्या लोकांवर त्या त्या वेळी पोलिसी कारवाई होत असते, असेही चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : सत्तेची ‘नशा’ उतरवली

Panchang 28 February 2026: आजच्या दिवशी हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

T20 WC, Semi Final Fixture : इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला, पण कोणाला भिडणार? वानखेडे स्टेडियमवर कल्ला होणार... जाणून घ्या समीकरण

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २८ फेब्रुवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

SCROLL FOR NEXT