सातारा

खंडाळा नगरपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा, व्यापारी संघटना आक्रमक

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : शहाराचा दैनंदिन व आठवडा बाजार मुख्य रस्त्यावर न भरवता येथील बाजारतळावरच भरवावा, अन्यथा येत्या गुरुवारी नगरपंचायत कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करणार असल्याची माहिती शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र गाढवे यांनी दिली. 

याबाबतचे निवेदन आज (सोमवार) तहसीलदार, नगरपंचायत मुख्यधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग व खंडाळा पोलिस ठाण्यात देण्यात आले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष गाढवे, सदस्य रवींद्र देशमुख, इम्तियाज मुलाणी, बालाजी मोरे, नितीन साळुंखे, विष्णुपंत भोसले, बाळासाहेब शिराळकर, रघुनाथ ढमाळ, कृष्णराव जमदाडे, गणेश गाढवे, रवी पवार, यशवंत वळवी, तेजस गाढवे, निशिकांत साठे उपस्थित होते.

गळिताची तयारी, पण एफआरपीचे काय?; शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष
 
येथील शहराच्या मुख्य रस्त्यावर बाजार भरत असल्याने अनेक वेळा वाहनचालक व विक्रेते यांच्यात वादावादी होऊन वाहनकोंडी होत असते. या रस्त्यावर सर्व शासकीय मुख्य कार्यालय असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना या बाजाराचा त्रास सहन करावा लागतो. गर्दीही मोठी होत असते, म्हणून हा बाजार शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या बाजारतळावर दैनंदिन व आठवडा बाजार भरवावा, असे पत्र चार सप्टेंबरला नगरपंचायतीला दिले होते. मात्र, यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे येत्या गुरुवारी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : हळू येतो म्हणाले, पण ‘ते’आलेच नाहीत!, उत्तुर घाटात झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं; चातकासारखी वाट पाहणाऱ्या भावाचा आक्रोश

'माधुरीनं आजपर्यंत कधीच...' धक धक गर्लबद्दल बोलताना रवी किशन म्हणाले... 'ती तिच्या आयुष्यात...'

Tukaram Mundhe : आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

Monsoon Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे ! महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता; 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीत आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता, आज मंत्री महाजन- उदय सामंत यांच्यात होणार चर्चा

SCROLL FOR NEXT