सातारा

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे; तारळे टपाल कार्यालयात ग्रामस्थांना बसला सुखद धक्का

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : येथील टपाल कार्यालयातील व्यवहारांचा गेल्या काही महिन्यांपासून बोजवारा उडाला होता. नेट नाही, माणूस नाही, उद्या या, परवा या उत्तराने ग्राहक हवालदिल झाले होते. वेळेला कोणतेच काम होत नसल्याने ग्राहकांची अक्षरशः ससेहोलपट सुरू होती. हे टपाल कार्यालय म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा' झाल्याची भावना ग्राहकांत वाढली होती. अशात "सकाळ'ने पोस्ट विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून या स्थितीबाबत अवगत तर केले शिवाय वृत्त प्रकाशित केले. याची वरिष्ठांनी ताबडतोब दखल घेत येथे नवे दोन कर्मचारी पाठवून ग्राहकांची गैरसोय दूर केली. त्यामुळे ग्राहक "सकाळ'ला धन्यवाद देत आहेत. शिवाय अधिकाऱ्यांचेदेखील आभार मानले.

तारळे विभागातील आर्थिक व्यवहाराचे केंद्र म्हणून टपाल कार्यालयाकडे पाहिले जाते. विशेषतः दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या अशिक्षित व अडाणी जनतेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात आहेत. गत काही महिन्यांपासून येथील भार दोघांच्याच खांद्यावर होता. त्यातील एकाला लॉगिन आयडी पासवर्ड नव्हता. अशामुळे ग्राहकांची कामे खोळंबून राहू लागली. नेट नाही, माणूस नाही, उद्या या, परवा या उडवाउडवीच्या उत्तराने ग्राहक हवालदिल होता. ग्राहकांची अक्षरशः ससेहोलपट सुरू होती.
 
परिणाम डोंगरावर राहणारी अडाणी माणसे हतबल झाली आहेत. कार्यालयातील सर्व व्यवहारांत अनियमितता आली होती. किरकोळ कारणावरून अडवणूक होत होती. याकडे वरिष्ठ कार्यालय व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत बघ्याची भूमिका घेतली होती. ही भूमिका बदलण्यास "सकाळ'ने भाग पाडले. लोकांच्या होणाऱ्या गैरसोयींबाबत "सकाळ'ने पुढे येऊन व्यथा मांडली. शिवाय अधिकाऱ्यांनाही या स्थितीची कल्पना दिली. त्यावर तत्परतेने कारवाई करीत येथे दोन कर्मचारी पाठवून कारभार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

आठवडी बाजारामुळे गर्दी 

दरम्यान, शनिवार आठवडी बाजार असल्यामुळे टपाल कार्यालयात व्यवहारासाठी ग्राहकांनी कार्यालयात गर्दी केली होती. मात्र, सर्वांची कामे वेळेत झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

गट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घ्या; रामराजेंचे सातारा पालिकेस आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा इशारा 16 ते 18 एप्रिलदरम्यान येलो अलर्ट

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT