सातारा

साता-यातील गुरुवार बागेतून झाेपाळे चाेरीस

गिरीश चव्हाण

सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेत असणाऱ्या शाहू उद्यान (गुरुवार बाग) येथून चोरट्यांनी 21 ते 24 या कालावधीत आठ हजार रुपये किंमतीचे दोन झोपाळे चोरुन नेले. याबाबतची तक्रार संजय विठ्ठल शिंदे (राहणार. केसरकर पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

काेराेनाच्या पार्श्वभुमीवर मार्च महिन्यांपासून शहरातील विविध उद्यान बंद आहेत. यामध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान, राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भाेसले उद्यान, शाहू उद्यान याचा समावेश आहे. ही सर्व उद्याने पालिकेच्या मालकीची आहेत. यामधील काही उद्याने ही ठेका पद्धतीने चालविण्यास देण्यात आलेली आहेत.

सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे; उदयनराजेंचा बेधडक आराेप

सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गुरुवार पेठेत असणारे शाहू उद्यान (गुरुवार बाग) हे देखील ठेकेदाराच्या ताब्यात आहे. सध्या हे उद्यान नागरिकांसाठी
बंद आहे. या उद्यानाचा परिसर माेठा आहे. येथे घसरगुंडी, झाेपाळा, पाळणा, घाेडागाडी अशी विविध प्रकारची खूप खेळणी आहेत. त्यातीलच दाेन झाेपाळ्यांची नुकतीच चाेरी झाली आहे. त्याबाबतची तक्रार पाेलिस ठाण्यात नाेंदवली आहे. त्याचा तपास हवालदार ए.एस. दगडे हे करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

५०० रुपयांची लाच आणि थेट एसीबीच्या जाळ्यात! भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक प्रताप

Mumbai News: खाकी जाणार, सफारी येणार; ठाणे पालिकेतील शिपायांचा गणवेश रुबाबदार होणार

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT