सातारा

मृत महिलेच्या दागिन्यांची झाली चोरी; सिव्हीलची अब्रू चव्हाट्यावर

गिरीश चव्हाण

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मृत झालेल्या अरुणा गोपीनाथ काळे (वय 65, हल्ली रा. यादोगोपाळ पेठ, सातारा, मूळ रा. मुंबई) यांच्या गळ्यातील दागिने शनिवारी सकाळी अज्ञाताने लांबवले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर झाल्याने रुग्णालय प्रशासन, तसेच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
 
साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील अरुणा काळे यांना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या इतर शासकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासण्या सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावल्याने काळे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना काळे यांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेताना काळे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले.

त्यांनी पाहणी केली असता अतिदक्षता विभागात काळे यांच्या गळ्यातील सोन्याच्या माळेतील काळेमणी पडल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्यांनी याची माहिती रुग्णालयीन वरिष्ठांना, तसेच पोलिसांना दिली. वरिष्ठांनी, तसेच पोलिसांनी माहिती घेत त्याठिकाणचे फुटेज तपासणी सुरू केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी मृतदेहाच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्यांचा, तसेच अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्यांची चौकशी सुरू केली. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पाणीवाटपावरून म्हासुर्णेत सख्या भावाचा खून; वडिलांसह दोघांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम! जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून कौतुक; उद्धव ठाकरेंवर केली टीका, काय म्हणाले?

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे राममंदिराच्या दिशेनं रवाना

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT