सातारा

सहलीहून परतल्यानंतर 33 विद्यार्थी कोरोनाबाधित? युद्धपातळीवर उपाययाेजना सुरु

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : एकंबे (ता. कोरेगाव) परिसरातील एका निवासी शाळेतील 33 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नुकतीच संबंधित शाळेस भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि उपाययोजनेसंदर्भात आवश्‍यक सूचना केल्या.
 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 23 तारखेला या शाळेची सहल सातारा परिसरात गेली होती. त्यानंतर गेल्या पाच तारखेला दोन विद्यार्थ्यांना पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये किरकोळ आजाराच्या तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यापैकी एक जण रॅट पॉझिटिव्ह आढळून आला, तर दुसऱ्याचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. सहा) शाळेतील सर्व 43 विद्यार्थी व 16 कर्मचारी, अशा एकूण 59 जणांपैकी 58 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात 33 विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांना सातारा येथील जंबो कोविड रुग्णालयात, तर एकाला बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. होम आयसोलेशनमध्ये 28 जण असून, त्यांच्यावर तडवळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रथमोपचार करण्यात आला आहे. बाधित नसलेल्या विद्यार्थ्यांवर प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात आले आहेत. शाळेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियंत्रण पथक कार्यरत असून, संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली.

बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court ची रेल्वेच्या 'सेकंड-क्लास पॅसेंजर' शब्दप्रयोगावर नाराजी; अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

Pune: मिरज सभापती-उपसभापतींची निवड रद्द; विभागीय आयुक्तांचे फेरनिवडणुकीचे आदेश; विशाल पाटील यांना धक्का

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवर शरद पवारांचा सरकारला इशारा; मुदतीत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar: बाबा, दारू विकू नका; लेकीनं शपथ घालताच बापानं दुकानाला लावलं कुलूप, सुरू केला नवा व्यवसाय

Rohit Sharma Retirement: रोहितच्या निवृत्ती प्रकरणात मोठा ट्विस्ट! अगरकर-गंभीरवर BCCI नाराज? इनसाइड स्टोरी आली समोर,नेमक काय घडल ?

SCROLL FOR NEXT