Accident News Esakal
सातारा

Accident News: पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक; अंगावरून चाक गेल्याने दोघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच सातारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर काल (सोमवारी) रात्री सुमारास ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने जात होता. या ट्रकने रात्रीच्या सुमारास लिंबेगावजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टरवर बसलेली महिला आणि पुरुष खाली पडले.

त्याचवेळी त्यांच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेले. या घटनेत पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अपघातात ट्रकमधील एकजण देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT