सातारा

ग्रामपंचायत आमच्या 'हक्काची'च.. दरेकरांचा नारा!

गिरीश चव्हाण

सातारा : दरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आमच्या हक्काची, अशी घोषणा दिली आहे. याच अनुषंगाने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद तसेच इतर प्रशासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. याच पत्रव्यवहाराची दखल घेत जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठीचा प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश दरे बुद्रुकच्या गावकारभाऱ्यांना दिले आहेत. 

हद्दवाढीनंतर दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग सातारा पालिकेत सहभागी झाले आहेत. दरे खुर्द परिसरातील तीन प्रभाग पालिकेत गेल्याने दरे बुद्रुक ग्रामपंचायतीची अस्तित्वाची लढाई जानाईदेवी प्रभाग आणि त्यातील दोन सदस्यांच्या जोरावर सुरू झाली आहे. याबाबत गावातील प्रमुखांनी नुकतीच जिल्हा परिषदेत जावून हद्दवाढीमुळे दरे बुद्रुकच्या झालेल्या राजकीय आणि प्रशासकीय कोंडमाऱ्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली. गावकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी योग्य तो पाठपुरावा करत दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे राजकीय आणि प्रशासकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य स्वाती विश्‍वास मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यापूर्वी दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचा कारभार दरे खुर्द येथील सदस्यांच्या बळावर आम्ही करत होतो. त्याठिकाणचे तीन प्रभाग पालिकेत गेल्याने ग्रामपंचायतीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. हे अस्तित्व टिकविण्यासाठी आम्ही तसेच गावातील इतर ज्येष्ठ सक्रिय झाले आहेत. 

दरे बुद्रुकची सध्याची लोकसंख्या विचारात घेता, नवीन ग्रामपंचायत लोकसंख्येच्या निकषावर पुन्हा निर्माण होऊ शकते. याचसाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करत आहोत. आमची स्वतंत्र ग्रामपंचायत नव्याने अस्तित्वात आल्यास दरे बुद्रुक आणि परिसराच्या विकासाला चालना मिळू शकते. एकमुखी गाव व भौगोलिक सलगता असणारी ग्रामपंचायत नव्याने निर्माण व्हावी, यासाठी आम्ही योग्य पातळीवर पाठपुरावा सुरू केल्याचेही मोरे यांनी या वेळी सांगितले. या अनुषंगाने सातारा बाजार समितीचे संचालक दत्ता शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही दरे बुद्रुकची स्वतंत्र आणि नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे. यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असून, त्यांनी नव्याने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याची माहिती दिली. 

यापूर्वी लोकसंख्येच्या निकषावर दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचा निधी विस्तारित भागातील विकासकामांसाठी जास्त खर्च होत होता. यामुळे दरे बुद्रुकच्या विकासावर त्याचा परिणाम होत होता. नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यास याठिकाणचा भौगोलिक विकास झपाट्याने होईल व सलगतेच्या मुद्यावर नव्याने येणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकवाक्‍यता निर्माण होईल. याच आशयाच्या प्रतिक्रिया विकास सोसायटीचे संतोष मोरे, अशोक मोरे, भाग्यवान मोरे तसेच इतर ग्रामस्थांनीही व्यक्‍त केल्या. दरे बुद्रुक ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी ग्रामस्थ आग्रही, आक्रमक असून, त्यांच्या नजरा आता प्रशासकीय कार्यवाहीकडे खिळल्या आहेत. (समाप्त)

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: देश मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर... पर्यावरण बदलामुळे अर्थव्यवस्थेलाही बसणार फटका; राज ठाकरेंचा गंभीर इशारा

Gold Rate Today: सोन्यातील घसरण कायम! सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त; चांदीही घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Monsoon Arrival Maharashtra : महाराष्ट्राच्या दिशेने मॉन्सूनची वाटचाल वेगवान; ७ ते ८ जूनदरम्यान आगमन, बंगालच्या उपसागरात मॉन्सून पट्टा अधिक तीव्र

Latest Marathi News Live Update : बावधनजवळ अवजड वाहन बंद पडल्याने मुंबई-बंगळूर महामार्गावर 10 किमी लांब वाहतूक कोंडी

Mumbai-Goa Highway : मंत्री गडकरींचे आश्वासन हवेत विरले? कोलेटी पुलाच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी; मुंबई-गोवा महामार्गाचे काम 18 वर्षांपासून सुरू!

SCROLL FOR NEXT