सातारा

खवल्या मांजर तस्करीप्रकरणी कोरेगावसह वाई तालुक्यातील संशयितांचा जामीन फेटाळला

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : सुरूर रस्त्यावर झालेल्या कारवाईतील खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी अटक केलेल्या सात संशयितांचे जामीन अर्ज नुकतचा वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी फेटाळला. या संशयितांची सातारा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वन विभागाने सुरूर- वाई रस्त्यावरील केंजळ फाट्यावर सापळा रचून जिवंत खवले मांजरासह पाच तस्करांना ताब्यात घेतले होते. सुमारे 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
 
त्यानंतर त्यांच्या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली. दिलीप बाबूराव मोहिते, मयूर सतीश केंजळे, अक्षय दिलीप मोहिते (तिघेही रा. पिंपोडे बु. ता. कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (रा. धावडी), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (रा. बालेघर), प्रकाश भीमराव शिंदे (शिरगाव, ता. वाई) व सुशांत विजय शेलार (रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली होती. वन कोठडीची मुदत संपल्यानंतर या सातही जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यापुढे सुनावणी झाली.

वाघ आणि खवल्या मांजर हे वन्यप्राणी अनुसूची एकमधील दुर्मीळ वन्यप्राणी आहेत. मुंबई उच्च न्यायालय व नागपूर खंडपीठाच्या निकालाचा दाखला देत या संशयितांचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकील मिलिंद पांडकर, तसेच सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे व गणेश महांगडे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.

ही दाेस्ती तुटायची नाय! आम्ही एकत्र येऊ नये का? शशिकांत शिदें

पुणे- बंगळूर महामार्गावरील अपघातात बंगळूर, वसईच्या महिला ठार; तिघे जखमी 

ऐषआराम करण्यासाठी हृदया गुप्ताने 81 लोकांना 13 कोटींना फसविले; पुण्यासह नगर, बीड, सातारकरांचा कपाळावर हात

मराठमाेळ्या महिला शेतकऱ्यांनी सहारनपूर बॉर्डर दणाणून सोडली

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT