सातारा

वाई-धोम खून खटल्यातील मुख्य संशयित आराेपी संताेष पाेळला न्यायालयाने खडसावले

प्रवीण जाधव

सातारा : वाई-धोम खून सत्रातील मृत मंगल जेधे व माफीची साक्षीदार ज्योती मांढरे (Jyoti Mandhare) या दोघींमध्ये 8 दिवसांत तब्बल 31 तास बोलणे, तसेच मेसेज झाल्याचे उलट तपासात समोर आले. दरम्यान, मुख्य संशयित संतोष पोळ (Santosh Pol) याने कारागृहामधून अर्ज न करता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयासमोर थेट तक्रारी मांडण्यास न्यायालयाने सांगितले. 

वाई-धोम खून सत्राच्या खटल्याची सध्या जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये माफीची साक्षीदार ज्योती मांढरे यांचा उलट तपास सुरू आहे. गुरुवारी नियमितपणे त्याला सुरवात झाली. या वेळी झालेल्या उलटतपासामध्ये मंगल जेधे व माफीची साक्षीदार मांढरे यांचे आठ दिवसांत तब्बल 31 तास फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी जे सीडीआर न्यायालयात दाखल केले आहेत त्यातून ही बाब समोर आली. त्यांच्यामध्ये मेसेजही झाल्याचे न्यायालयात समोर आले.
 
दरम्यान, कथीत डॉ. पोळ जेलमधून वारंवार तक्रार अर्ज करत असल्याने न्यायाधीशांनी त्याबाबत सुनावले. प्रत्येक सुनावणीसाठी तुम्हाला साताऱ्यात आणले जाते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही होते. तेव्हा तुम्ही तक्रार करत नाही. कारागृहातून मात्र, तक्रार अर्ज करत असता आता इथून पुढे तुम्ही थेट वकिलांच्या माध्यमातून तक्रार द्या, असे न्यायाधीशांनी पोळला सुनावले. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) , संशयित पोळ, माफीची साक्षीदार ज्योती मांढरे, बचाव पक्षाचे वकील ऍड. श्रीकांत हुटगीकर न्यायालयात उपस्थित होते. उद्या पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाचा अंतिम लढा छत्रपतीं च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT