Uddhav Thackeray Sharad Pawar esakal
सातारा

NCP चा बालेकिल्ला असणारा 'हा' मतदारसंघ शरद पवार शिवसेनेला सोडणार? लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांच्या इच्छेला कसा न्याय देणार?

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीला इंडिया आघाडी म्हणून आपण सामोरे जाणार आहोत. शरद पवार सुद्धा आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सातारा : सातारा लोकसभेची जागा ठाकरे गट शिवसेनेने लढवावी. यापूर्वीच्या निवडणुकांत (LokSabha Election) पक्षाच्या उमेदवारांना या मतदारसंघातून अडीच लाखांवर मते मिळाली आहेत. त्यामुळे यावेळी ही जागा आपण लढावी, अशी आग्रही मागणी ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे केली.

मात्र, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, खासदार शरद पवार (Sharad Pawar) हा मतदारसंघ सोडणार का? हा प्रश्न आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे एकही मातब्बर नेता जिल्ह्यात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांच्या इच्छेला कसा न्याय देणार? याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे नेते निरीक्षक खासदार विनायक राऊत, सूरज चव्हाण, माजी मंत्री दिवाकर रावते, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तसेच जिल्हा व तालुकाप्रमुख उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीला इंडिया आघाडी म्हणून आपण सामोरे जाणार आहोत. शरद पवार सुद्धा आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच आघाडीतील घटक पक्षांच्या एकत्रित बैठका विविध मतदारसंघात घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

भाजप-सेना युती असताना हा मतदारसंघ सेनेकडे होता. या मतदारसंघातून सेनेच्या चिन्हावर पुरुषोत्तम जाधव लढले होते. त्यानंतर भाजपात असलेल्या माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सेनेत घेऊन २०१९ ला लढवले होते. या दोघांनीही चांगली मते मिळाली होती. त्यामुळे आता पुन्हा या मतदारसंघाची मागणी होणे साहजिक आहे.

मात्र, ठाकरे गटाकडे साताऱ्यात एकही मातब्बर नेता नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या इच्छेला उद्धव ठाकरे कसा न्याय देणार? याची उत्सुकता आहे. सातारा लोकसभेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने खासदार शरद पवार हा मतदारसंघ ठाकरे गट शिवसेनेसाठी सोडणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

जिल्ह्यात यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने अडीच लाखांवर मते घेतली होती. ही मते मूळची शिवसेनेची असून, उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या मतदारांची ही मते आहेत. त्यामुळे यावेळेसही सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार द्यावा, अशी मागणी आम्ही श्री. ठाकरे यांच्याकडे आजच्या आढावा बैठकीत केली आहे.

-सचिन मोहिते (जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT