सातारा

रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा; नडशीतील महिलेची वाहनातच झाली प्रसूती!

अनिल घाडगे

शिरवडे (जि. सातारा) : वेळेत रुग्णवाहिका न आल्याने नडशी (ता. कऱ्हाड) येथील महिलेची खासगी वाहनातच प्रसूती झाली. त्यातच प्रसूतीनंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यास विलंब झाला. त्यावरून आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

नडशीत विवाहिता माहेरी वास्तव्यास आहे. संबंधित महिलेला पहाटे तीनच्या सुमारास प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाइकांनी 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला; परंतु पहाटे साडेपाचपर्यंत रुग्णवाहिका आलीच नाही. महिलेला वेदना असह्य झाल्याने नातेवाइकांनी गावातील वाहनातून महिलेला रुग्णालयात हलवले. दरम्यान, गावापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर महिलेची गाडीतच प्रसूती झाली.

त्यानंतर पुढील उपचारासाठी त्या महिलेला कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाला तातडीने उपचाराची आवश्‍यकता असताना तेथेही त्या महिलेला दाखल करण्यात रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर महिलेला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. या घटनेबाबत नडशी व परिसरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या संतापजनक कारभारामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. हा असाच प्रकार यापुढे सुरु राहिला तर हकनाक जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT