Apple
Apple google
विज्ञान-तंत्र

Apple कंपनीचा मोठा निर्णय; आता चोरीला गेलेला iPhone ठरणार निरुपयोगी

सकाळ डिजिटल टीम

महागड्या आयफोनची चोरी कोणत्याही वापरकर्त्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरु असतो त्यामुळे आयफोन चोरी होऊ नयेत म्हणून कंपनीने काही बदल स्विकारले आहेत. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अॅपलने नवीन पॉलिसी लागू केली आहे, ज्यामध्ये चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या आयफोनबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, आता चोरीला गेलेला आयफोन पुन्हा वापरता येणार नाही. चोरीला गेलेला आयफोन Apple स्टोअर किंवा Apple अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर्स ृकडे दुरुस्तीसाठी आणल्यास, ते डिव्हाईस दुरुस्त केले जाणार नाही. चोरीला गेलेले आणि हरवलेले आयफोन दुरुस्त करण्यावर बंदी घालण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

डिव्हाइस रजिस्ट्री म्हणजे काय

MacRumors च्या रिपोर्टनुसार जर अॅपलचे कोणतेही उपकरण हरवले असेल, ज्याची तक्रार GSMA Device Registry कडे केली असेल, तर अशा उपकरणाची दुरुस्ती केली जाणार नाही. GSMA डिव्‍हाइस रजिस्‍ट्री हा एक प्रकारचा आंतरराष्‍ट्रीय डेटाबेस आहे जेथे सर्व Apple डिव्‍हाइस मालकाची माहिती असते आणि या डेटाबेसमध्‍ये संपूर्ण डिव्‍हाइसची माहिती ऑनलाइन उपलब्‍ध असते, जिथून फोन हरवला की चोरीला गेला हे शोधता येते.

चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न

या धोरणाच्या मदतीने अॅपल आयफोनच्या चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. Apple ने याआधी हरवलेले किंवा चोरीला गेलेल्या iPhones ची दुरुस्तीसाठी नकार दिला होता, परंतु त्यात Find My फीचर नसेल तर असे केले जात असे.

Apple सेल्फ सर्व्हिस रिपेअर

Apple ने अलीकडेच 'सेल्फ सर्व्हिस रिपेअर' सुरू केले आहे, जे वापरकर्त्यांना ऑनलाइन स्टोअरद्वारे आयफोन दुरुस्त करण्यास परवाणगी देते. याची सुरुवात iPhone 12 आणि iPhone 13 लाइनअपसह करण्यात आली आहे. लवकरच M1 चिप्स असलेले मॅक संगणक देखील या धोरणात समाविष्ट केले जातील. प्लॅटफॉर्ममध्ये 5,000 पेक्षा जास्त Apple अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर्स (AASPs) आणि 2,800 स्वतंत्र रिपेयर प्रोव्हायडर्स आहेत ज्यांना हे पार्ट, टूल्स आणि मॅन्युअलचा एक्सेस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT