Pran Pratishtha Record eSakal
विज्ञान-तंत्र

Pran Pratishtha Record : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा असाही विक्रम.. ठरलं यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलं गेलेलं लाईव्हस्ट्रीम!

सुरक्षेच्या कारणास्तव या सोहळ्याला अयोध्येत सामान्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र टीव्ही, यूट्यूब आणि ओटीटीच्या माध्यमातून कोट्यवधी भाविकांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला.

Sudesh

Ramlalla's Pran Pratishtha Live Stream : अयोध्येतील भव्य राम मंदिरात सोमवारी ऐतिहासिक असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. जगभरातील कोट्यवधी श्रीरामभक्तांचं स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झालं. सुरक्षेच्या कारणास्तव या सोहळ्याला अयोध्येत सामान्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र टीव्ही, यूट्यूब आणि ओटीटीच्या माध्यमातून कोट्यवधी भाविकांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला.

यूट्यूबवर या सोहळ्याने लाईव्ह स्ट्रीमिंगचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवरील Ram Lalla's Pran Pratishtha या व्हिडिओने यूट्यूबच्या इतिहासात सर्वाधिक लाईव्ह स्ट्रीम व्ह्यूअरशिप मिळवली. तब्बल 19 मिलियन लोकांनी या चॅनलवर हा सोहळा लाईव्ह पाहिला.

नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरुन या सोहळ्याचे दोन व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्यात आले होते. यातील एका व्हिडिओला 10 मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिलं, तर दुसऱ्या व्हिडिओला 9 मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिलं. केवळ एका व्हिडिओच्या माध्यमातूनच यूट्यूबवर एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या व्हिडिओने चांद्रयान-3 लँडिंग, फिफा वर्ल्डकप सामने या सर्व लाईव्ह व्हिडिओंना मागे टाकलं आहे.

दुसरा क्रमांक चांद्रयानाचा

यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या लाईव्हस्ट्रीम व्हिडिओंमध्ये पहिल्या क्रमांकावर रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चांद्रयान-3 लँडिंग व्हिडिओ आहे. या व्हिडिओला 8.09 मिलिनय लाईव्ह व्ह्यूअर्स मिळाले होते. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर 2022 साली झालेल्या फुटबॉल विश्वचषकातील दोन सामने आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT