Bajaj CNG Chetak eSakal
विज्ञान-तंत्र

Bajaj CNG Chetak : पेट्रोलची किंमत अन् चार्जिंगची रेंज.. दोन्हीची चिंता सोडा! बजाज आणतंय सीएनजी स्कूटर

मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समधून ही माहिती समोर आली आहे. 2024 किंवा 2025 साली ही स्कूटर मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते.

Sudesh

Bajaj Chetak CNG Model : पेट्रोलच्या किंमती वाढत असताना लोक सातत्याने त्यासाठी पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र रेंज आणि बॅटरीची किंमत यामुळे बरेच लोक त्याकडेही पाठ फिरवतात. अशातच बजाजने या दोन्ही समस्यांवर उपाय उपलब्ध केला आहे. लवकरच बजाजच्या चेतक स्कूटरचं सीएनजी व्हर्जन लाँच होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समधून ही माहिती समोर आली आहे. 2024 किंवा 2025 साली ही स्कूटर मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते. अर्थात, बजाजने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

आधीच दिली होती कल्पना

बजाजच्या या स्कूटरबाबत राजीव बजाज यांनी 2008 सालीच भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, की कंपनी अशा एका स्कूटरवर काम करत आहे, ज्यामध्ये ड्युअल इंजिन व्हेरियंट उपलब्ध केले जाईल. अखेर आता इतक्या वर्षांनंतर चेतक CNG बाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

डिजिटल अन् मॉडर्न

काळानुरूप आपल्या चेतक या स्कूटरमध्ये बजाजने मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. इलेक्ट्रिकचा जमाना सुरू झाल्यानंतर कंपनीने चेतक इलेक्ट्रिक देखील लाँच केली होती. आता कंपनी सीएनजी व्हेरियंटवर काम करत आहे. हे मॉडेल अगदी डिजिटल आणि मॉडर्न असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT