Budget Sunroof Cars  esakal
विज्ञान-तंत्र

Budget Sunroof Cars : परवडणाऱ्या दरात घ्या सनरूफ कार

ह्युंदाईची हॅचबॅक कार i20 या यादीत पहिल्या क्रमांकावर

सकाळ डिजिटल टीम

Budget Sunroof Cars : जर तुम्ही स्वतःसाठी सनरूफ कार घेण्याची योजना आखत असाल तर आम्ही तुम्हाला काही परवडणाऱ्या कारची माहिती देणार आहोत. ज्याचा तुम्ही विचार करू शकता.

ह्युंदाईची हॅचबॅक कार i20 या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने या कारच्या Asta वेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ दिले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत आहे 9.01 लाख रुपये. या यादीत टाटाची टाटा नेक्सॉन कार दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही कार देशांतर्गत बाजारात सनरूफसह येणारी सर्वात परवडणारी SUV कार आहे. कंपनी त्याच्या XM (S) प्रकारात सनरूफ देते. या कारची एक्स-शोरूम किंमत आहे 9.40 लाख रुपये.

या यादीतील पुढील कार महिंद्रा XUV300 आहे. कंपनीने या कारच्या W6 प्रकारात SUV फीचर्स दिले आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत आहे 10 लाख रुपये. ह्युंदाई व्हेन्यू कार चौथ्या क्रमांकावर आहे. कंपनीने या कारच्या SX प्रकारात सनरूफ दिले आहे. या कारचं SX व्हेरियंट 10.89 लाख रुपयांपर्यंत आहे.

पाचव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची ब्रेझा कार आहे. मारुती या कारच्या टॉप एंड व्हेरियंट ZXI मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ फीचर देते. कंपनी आपली कार 10.95 लाख रुपयांना विकते. नुकतीच लाँच झालेली ह्युंदाई वेर्ना सेडान कारही या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. कंपनी या कारच्या टॉप एंड व्हेरियंट SX मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ देते. तर या कारची एक्स-शोरूम किंमत आहे 12.98 लाख रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT