Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : चंद्रावर होणार सूर्योदय; पण 'चांद्रयान-3'च्या लँडर-रोव्हरला जागच आली नाही तर?

Pragyan Rover : चांद्रयान-3 मोहिमेचा कालावधी हा केवळ 14 दिवसांचा ठेवण्यात आला होता.

Sudesh

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. चंद्रावर लँड झाल्यानंतर सुमारे दोन आठवडे प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने विविध प्रकारचं संशोधन केलं. यानंतर हे दोन्ही डिव्हाईस स्लीप मोडवर गेले होते.

आता 22 सप्टेंबर रोजी, म्हणजे उद्या चंद्रावर सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचा प्रकाश या डिव्हाईसवर पडणार आहे. यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. मात्र, चंद्रावरील रात्रीचं तापमान पाहता, या दोन्ही मशीन्स पुन्हा कधीच सुरू न होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

चंद्रावरील रात्र ही पृथ्वीच्या 14 दिवसांएवढी असते. या कालावधीमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळचं तापमान उणे 150 ते उणे 250 डिग्री सेल्सिअस एवढं होऊ शकतं. या तापमानाला प्रज्ञान आणि विक्रम दोन्हीही गोठून जातात. त्यामुळे ही उपकरणं पुन्हा चालू होण्याची शक्यता अगदी कमी आहे, असं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

यामुळेच चांद्रयान-3 मोहिमेचा कालावधी हा केवळ 14 दिवसांचा ठेवण्यात आला होता. या कालावधीमध्ये चंद्रावर सूर्यप्रकाश असणार होता. 23 ऑगस्टला लँड झालेल्या चांद्रयान-3 ने दोन आठवड्यांमध्ये नेमून दिलेलं काम चोख पार पाडलं. त्यानंतर 4 सप्टेंबरला ते स्लीप मोडवर ठेवण्यात आलं होतं.

जर प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील सूर्योदयानंतर काही वेळेत सक्रिय झालं, तर ते पुन्हा 14 दिवस आधीप्रमाणेच अधिक माहिती पाठवू शकेल. मात्र तसं झालं नाही, तर विक्रम आणि प्रज्ञान हे भारताचे दूत म्हणून कायम तिथेच राहतील. असे बंद पडलेले रोव्हर पुन्हा सुरू करण्याइतपत आपलं तंत्रज्ञान विकसित झालेलं नाही.

दरम्यान, प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने त्यांना नेमून दिलेली कामगिरी पार पाडली आहे. तसंच, भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या आदित्य एल-1 ने देखील डेटा कलेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आदित्य उपग्रह एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT