WhatsApp Status google
विज्ञान-तंत्र

WhatsApp Status पाहिला, पण कोणाला कानोकान खबर नाही? शक्य आहे...ही आयडिया ट्राय करा

पण आता त्याची काही एक गरज नाहीये. तुम्ही बिनधास्तपणे ज्याचे हवे त्याचे स्टेटस बघू शकता, आणि कोणाला कानोकान खबरही लागणार नाही.

नमिता धुरी

मुंबई : WhatsApp म्हणजे लोकांचा जीव की प्राण! एकवेळ लोकांकडे कामधंदा नसेल पण व्हॉट्सअॅप नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. बरं, फक्त बेकार लोकं व्हॉट्सअॅप वापरतात असं काही नाहीये, तर कामासाठी जितका जीमेलचा लोक वापर करत नसतील, तितका वापर व्हॉट्सअॅपचा करतात. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

थोडक्यात व्हॉट्सअॅप हेजगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. जगभरात सुमारे 2 अब्ज लोक व्हॉट्सअॅप वापरतात. एवढ्या मोठ्या यूजर बेसचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी अनेक फीचर्स देत असते. मेसेज आणि कॉल्स व्यतिरिक्त, कम्युनिटी फीचर्स, स्टेटस आणि स्टोरीज असे बरेचसे फिचर व्हॉट्सअॅपवर असतात.

पण बऱ्याचदा असं होतं की, आपल्याला एखाद्या व्यक्तीचा स्टेटस तर बघायचा असतो पण आपण आपण त्याचा स्टेटस पाहिलाय हे त्याला समजेल म्हणून पाहायचं टाळतो. पण आता त्याची काही एक गरज नाहीये. तुम्ही बिनधास्तपणे ज्याचे हवे त्याचे स्टेटस बघू शकता, आणि कोणाला कानोकान खबरही लागणार नाही.

WhatsApp Status फीचर इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या स्टोरीप्रमाणेच असतं. युजर्स स्टेटस किंवा स्टोरी सेट करण्यासाठी कोणताही टेक्स्ट, फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या प्रोफाइलवर शेअर करतात. ही स्टोरी किंवा स्टेटस 24 तासांपर्यंतच अॅक्टिव्ह राहतो आणि त्यानंतर आपोआप डिलीट होतो.

incognito mode टॅब मध्ये स्टेटस बघा

सहसा, आपण एखाद्या व्हॉट्सअॅप युजरचा स्टेटस पाहतो तेव्हा त्यांना आपण त्यांचा स्टेटस पाहिलाय हे समजतं. पण बऱ्याच लोकांची इच्छा आपण स्टेटस पाहिलाय हे दिसू नये अशीच असते. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये थोडा बदल करावा लागेल. पण मग तुमचे स्टेटस कोणी पाहिलेत हे ही समजणार नाही.

त्यापेक्षा तुम्ही डेस्कटॉपवर WhatsApp सुरू करा आणि त्यासाठी incognito mode टॅब वापरा. तिथं तुम्ही कोणाचा स्टेटस पाहिलाय हे कोणालाच कळणार नाही.

WhatsApp read-receipt डिसेबल करा

तुम्ही जर व्हॉट्सअॅपचं read-receipt बंद केलं तर तुम्ही मॅसेज रीड केलाय का हे ही समोरच्या व्यक्तीला कळत नाही. कारण चॅटवरच्या ब्लू टिक्स बंद होतात. आणि तुम्ही कोणाचा स्टेटस पाहिलाय हे समोरच्याला समजतही नाही. पण हे WhatsApp read-receipt डिसेबल करण्यासाठी काय करावं लागेल. तर खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.

वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन-बिंदू मेनूवर टॅप करा आणि सेटिंग्ज निवडा.

Accounts वर क्लिक करा आणि प्रायव्हसी हा ऑप्शन निवडा.

आता रीड रिसिट्स टॉगल डिसेबल करा.

आता स्टेटस बघण्याचे याव्यतिरिक्तही काही ऑप्शन्स आहेत.

यासाठी WhatsApp सुरू करा आणि स्टेटस लोड होण्यासाठी काही मिनिटे वाट बघा.

आता वाय-फाय किंवा मोबाईल इंटरनेट बंद केल्यानंतरही तुम्ही चोरून स्टेटस पाहू शकता.

फाईल मॅनेजरवरून देखील व्हॉट्सअॅप स्टेटस पाहू शकता.

फाइल मॅनेजर उघडा आणि इंटर्नल स्टोरेज वर जा

तिथं WhatsApp सिलेक्ट करा आणि मीडियावर ऑप्शनवर जा.

आता Statuses फोल्डर ओपन करा.

या फोल्डरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्टच्या स्टेटसवर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT