Earth from Space Station eSakal
विज्ञान-तंत्र

Earth from Space Station : रात्रीच्या वेळी अंतराळ स्थानकातून कशी दिसते पृथ्वी? विहंगमय दृष्य दाखवणारा व्हिडिओ समोर

Earth at Night : रेडिट स्पेस व्ह्यू या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Sudesh

आपली पृथ्वी अंतराळातून कशी दिसते, हा विचार प्रत्येकाच्या मनात आलेला असतो. आतापर्यंत चंद्रावरुन, किंवा स्पेसमधून पृथ्वीचे कित्येक फोटो काढण्यात आले आहेत. तुम्ही इंटरनेटवर हे फोटो पाहिले असतील. मात्र, आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने पृथ्वीचा एक वेगळा व्हिडिओ शूट केला आहे.

अंतराळातील प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने, आपली पृथ्वी रात्रीच्या वेळी कशी दिसते हे दाखवलं आहे. रेडिट स्पेस व्ह्यू या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अर्थात, हे ISS चं अधिकृत हँडल नाही.

या व्हिडिओला तब्बल पाच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 9 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रकाशाने उजळून निघालेली कित्येक शहरं दिसत आहेत. तसंच कित्येक ठिकाणी ढगांमध्ये विजा चमकतानाही दिसत आहेत.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. या कक्षेमध्ये ते सातत्याने पृथ्वीभोवती फिरत असतं. या उंचीवरुन पृथ्वीचा सुंदर व्ह्यू दिसतो. केवळ शहरांमधील लाईट्स नाहीत, तर पृथ्वीभोवती नॉर्दन लाईट्समुळे होणारी बॉर्डरलाईनही याठिकाणाहून दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT