mark zukeberg sakal media
विज्ञान-तंत्र

फेसबुकला आता 'या' नावाने ओळखले जाणार

गुरुवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन नावाची घोषणा करण्यात आली

अक्षय साबळे

जगभरातील अब्जावधी वापरकर्ते असलेल्या फेसबुकने (facebook) आपले नाव बदलले आहे. गुरुवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन नावाची घोषणा करण्यात आली. यापुढे फेसबुकला 'मेटा' (meta) या नावाने ओळखले जाणार आहे. ( facebook new name rebrand meta Mark Zuckerberg )

गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकचे (facebook )नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आज अधिकृत रित्या त्याची घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेला रिब्रॅण्डिंग असे म्हणतात. फेसबुक रिब्रॅण्डिंगच्या माध्यमाने इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि ऑक्युलस असे ॲप्स एकाच छताखाली येतील. याबाबत संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अलीकडेच सूतोवाच केले होते.

दरम्यान, फेसबुकच्या माजी कर्मचारी, माहिती तज्ञ फ्रान्सेस हॉगन यांच्याकडून फेसबुकबाबत खळबळजनक खुलासे केले जात आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकी सिनेटच्या ग्राहक संरक्षक समितीसमोर फेसबुक कंपनीकडून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणून कशा रीतीने नफा कमावला जात आहे, याच पाढा वाचला होता. फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचार पसरविण्यासाठी केला जात आहे. या गोष्टी रोखण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे उपाय हे खूपच त्रोटक आहेत, असा दावा केला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचे नाव बदलण्यात आले आहे.यापूर्वी २०१५ मध्ये गुगलनेही अल्फाबेट स्थापन करुन कंपनीचा विस्तार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT