youtube first video 
विज्ञान-तंत्र

YouTube वर अपलोड केलेला पहिला VIDEO बघितला का?

सकाळ वृत्तसेवा

जगात व्हिडिओसाठी सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे युट्यूबचा. एप्रिल 2020 मध्ये युट्यूबला सुरु होऊन 15 वर्षे झाली. युट्यूबवर सर्वात पहिला व्हिडिओ 24 एप्रिल 2005 रोजी अपलोड करण्यात आला होता. कंपनीचा सहसंस्थापक जावेद करीमने हा व्हिडिओ अपलोड केला होता.

जावेद करीम कॅलिफोर्नियातील सॅन डियागो इथं एका प्राणीसंग्रहालयात गेला होता. त्याठिकाणी काही सेकंदाचा व्हिडिओ त्याने शूट केला होता. हा व्हिडिओ 18 सेकंदाचा असून जावेदचा मित्र याकोव्ह लापित्स्की याने रेकॉर्ड केला होता.

युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या पहिल्या व्हिडिओचं टायटल होतं 'Me at the Zoo' आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास दहा कोटी वेळा पाहण्यात आला आहे.

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही हा युट्यूबवर अपलोड केलेला पहिला व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जावेद करीम सॅन दिएगो शहरातील एका प्राणीसंग्रहालयात असल्याचं दिसतं. तिथं तो हत्तींच्या समोर उभा राहून त्यांच्याबद्दल बोलत आहे. जावेद म्हणतो की, या प्राण्यांबद्दल कुतुहलाची बाब म्हणजे यांची सोंड खूप खूप खूप लांब असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Cut : पुण्यात सोमवारपासून पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Pune News : शहरात १५ जूनपासून जड वाहनांना प्रवेश बंदी

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Accident : येरवडा, लोणी काळभोरमधील अपघातांत दोन ज्येष्ठांचा मृत्यू

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT