Gmail Translate eSakal
विज्ञान-तंत्र

Gmail Translate : आता कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करू शकाल ई-मेल; जीमेलमध्ये आलं मल्टी-लँग्वेज फीचर

Multi Language Feature : जर तुम्हाला अचानक वेगळ्याच भाषेत ई-मेल आला तर? अशा वेळी बऱ्याच जणांना गडबडून जायला होतं.

Sudesh

आजकाल बऱ्याच गोष्टींसाठी ई-मेलचा वापर केला जातो. एखाद्या परीक्षेचं वेळापत्रक, हॉल तिकीट किंवा नोकरीसाठी अर्ज करणे अशा बऱ्याच गोष्टींसाठी ई-मेलचा वापर केला जातो. नोकरीमध्ये तर जवळपास सर्व महत्त्वाची कामं मेलवरच होतात.

मात्र, जर तुम्हाला अचानक वेगळ्याच भाषेत ई-मेल आला तर? अशा वेळी बऱ्याच जणांना गडबडून जायला होतं. मात्र आता गुगलच्या जीमेलमध्ये मल्टी-लँग्वेज फीचर देण्यात आलं आहे. यामुळे तुम्ही दुसऱ्या भाषेतील ई-मेल हिंदी किंवा इंग्रजीसह इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार आहे.

जीमेलची ही सेवा डेस्कटॉप व्हर्जनसाठी आधीपासून उपलब्ध होती. मात्र, आता हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर देखील आलं आहे. यामुळे तुमचा ई-मेल 100 हून अधिक भाषांमध्ये ट्रान्सलेट होऊ शकणार आहे.

अशा प्रकारे करा उपयोग

यासाठी तुम्हाला सर्वात आधी जीमेल अ‍ॅप उघडावं लागेल. यानंतर जो ई-मेल तुम्हाला वाचायचा आहे, तो ओपन करा. यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा. यानंतर जे पर्याय येतील, त्यामधील ट्रान्सलेट ऑप्शन निवडा.

यानंतर तुमच्यासमोर विविध भाषांचे पर्याय उपलब्ध होतील. यामधील ज्या भाषेत तुम्हाला तो ई-मेल ट्रान्सलेट करून हवा आहे, ती भाषा निवडा. यानंतर काही सेकंदांमध्येच संपूर्ण ईमेल ट्रान्सलेट होऊन दिसेल.

बीटा फेजमध्ये फीचर

हे फीचर सध्या बीटा फेजमध्ये आहे. त्यामुळे हे पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. विशेषतः टेक्निकल गोष्टी किंवा कायदेशीर बाबींमध्ये यावर पूर्णपणे विसंबून राहू नका, असा इशाराही कंपनीने दिला आहे. या माध्यमातून एका वेळी एकच ई-मेल ट्रान्सलेट करता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT