Gmail Spam Policy eSakal
विज्ञान-तंत्र

Gmail Spam Policy : आता स्पॅम मेल्सची संख्या होणार आपोआप कमी; गुगल बदलतंय आपली जीमेल पॉलिसी!

Spam E-mails : नवीन पॉलिसीमध्ये यूजर्सना येणाऱ्या स्पॅम मेसेजना आळा बसणार आहे. एप्रिल 2024 पासून टप्प्या-टप्प्याने ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे.

Sudesh

Google Gmail Spam Policy : आपल्या सर्वांनाच ईमेलवर मोठ्या प्रमाणात स्पॅम मेसेज येतात. कित्येक वेळा या कंपन्यांच्या ऑफर्स असतात. यातील काही ई-मेल्सच्या माध्यमातून सायबर फसवणूक होण्याचा धोकाही असतो. शिवाय आपल्या इनबॉक्समध्ये हे स्पॅम मेल्स साठून राहिल्यामुळे भरपूर स्पेसही वाया जाते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून, गुगलने जीमेलसाठी आपली स्पॅम पॉलिसी अपडेट केली आहे.

नवीन पॉलिसीमध्ये यूजर्सना येणाऱ्या स्पॅम मेसेजना आळा बसणार आहे. एप्रिल 2024 पासून टप्प्या-टप्प्याने ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. यामुळे रोज स्पॅम मेल पाठवणाऱ्या कंपन्यांना मोठा दणका बसेल. (Gmail Spam Policy)

काय आहे पॉलिसी?

नव्या पॉलिसीनुसार, एका दिवसाला 5,000 पेक्षा अधिक प्रमोशनल ई-मेल (Promotional E-mail) पाठवणाऱ्या कंपन्यांची पडताळणी गुगल करणार आहे. जर एखादी कंपनी नियमात दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक ई-मेल्स पाठवत असेल, तर जादाचे मेल्स गुगलकडून रद्द करण्यात येणार आहेत. एका दिवसाला एखाद्या कंपनीला किती मेल पाठवता येतील, किंवा मग किती ई-मेल्सवर मर्यादा लागू होणार आहे याबाबत गुगलने अद्याप माहिती दिलेली नाही. (Google Spam Mail)

कंपनीच करणार तुमचं काम

जीमेलने यापूर्वीच आपल्या यूजर्सना एखादा प्रमोशनल मेल, न्यूजलेटर किंवा सबस्क्रिप्शन रद्द करण्याची प्रक्रिया सोपी करून दिली आहे. मात्र आता नव्या पॉलिसीमध्ये गुगल स्वतःच आपण कोणते ई-मेल पाहतो आणि कोणत्या मेलकडे दुर्लक्ष करतो या कडे लक्ष देणार आहे. यानुसार, तुम्हाला नको असणाऱ्या सेंडरचे ई-मेल कंपनी स्वतःच कमी करत जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT