Google  Sakal
विज्ञान-तंत्र

Chat GPT : "पुढच्या दोन वर्षांत Google संपेल"; Gmail च्या निर्मात्याची भविष्यवाणी

Chat GPT मुळे गुगलच्या व्यवसायाला धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित ChatGPT मुळे गुगल व्यवस्थापनात बरीच खळबळ उडाली आहे. गुगलला त्याच्या व्यवसायाला ChatGPT कडून धोका आहे असं वाटत आहे. त्यामुळे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वत: अनेक बैठका घेतल्या होत्या. आता Gmail चे निर्माते पॉल बुचेट यांच्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा आहे.

ChatGPT हे टूल पुढील दोन वर्षांत सर्च इंजिन कंपनी गुगलला संपवू शकते, असं वक्तव्य पॉल यांनी केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत, ChatGPT चा दहा लाखांहून अधिक लोकांनी वापर केला आहे. हे टूल गुगलपेक्षा खूप शक्तिशाली आहे. कारण, गुगलचे सर्च रिझल्ट हे लिंक्सवर आधारित असतात. पण, ChatGPT अवघड विषयही अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगते. त्याची भाषा अजिबात यांत्रिक वाटत नाही.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Gmail चे निर्माते पॉल बुचेट यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, Google एक किंवा दोन वर्षांत पूर्णपणे संपुष्टात येईल. या नव्या सर्च इंजिनमुळे सर्च ऑप्शन्सचं पेज काढून टाकलं जाईल. या ठिकाणी कंपनीला सर्वाधिक पैसे मिळतात. जरी कंपनीने AI वर प्रभुत्व मिळवले, तरीही कंपनी तिच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा भाग नष्ट केल्याशिवाय ते पूर्णपणे वापरात आणू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT