google search esakal
विज्ञान-तंत्र

Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु; लवकरच 'हे' बदल दिसतील

गुगलने मागे 'गुगल सर्च'सोबत जनरेटिव्ह एआयचं स्नॅपशॉर्ट हे फिचर प्रायोगिक तत्त्वावर लाँच केलं होतं. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला सर्च केलेल्या टॉपिकच्या संबंधाने एआय रिझल्ट्स दिसून येतात.

संतोष कानडे

Google AI Paid Service : सध्या आपण 'गुगल सर्च'चा फ्रीमध्ये वापर करत आहोत. परंतु आता कंपनी मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. 'गुगल सर्च'ची पेड सर्व्हिस सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनी त्यावर विचार करत असून त्यादृष्टीने लवकरच मोठे बदल होणार आहेत. कंपनीकडून अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार गुगल कंपनी पेड व्हर्जनसाठी मोठी तयारी करत आहे. आतापर्यत कंपनीने त्यांचं सर्च फिचर फ्री दिलेलं होतं. सर्चमधूनच कंपनीचा रेव्हेन्यू जनरेट होतो. आता कंपनी पॉलिसीमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. हे प्रीमियम फिचर वेगळंकाही नसून जनरेटिव्ह एआय आहे.

गुगलने मागे 'गुगल सर्च'सोबत जनरेटिव्ह एआयचं स्नॅपशॉर्ट हे फिचर प्रायोगिक तत्त्वावर लाँच केलं होतं. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला सर्च केलेल्या टॉपिकच्या संबंधाने एआय रिझल्ट्स दिसून येतात.

AI सर्च केलेल्या टॉपिकची एक समरी युजर्सला दिसते. आता यामध्येच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 'फायनान्शिअल टाईम्स'ने आपल्या रिपोर्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. जर गुगल असं काही करत असेल तर ही मोठी घडामोड घडणार आहे.

गुगल कंपनीने सर्च आणि सर्चच्या संबंधाने दिसणाऱ्या जाहिरातींवर मागच्या वर्षात १७५ अरब डॉलर्स कमावले आहेत. कंपनीच्या एकूण कमाईपेक्षा हा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा आहे. या कारणास्तव कंपनी आपल्या सर्च फिचरच्या माध्यमातून आणखी पैसे कमावण्याच्या विचारात आहे.

गुगल सर्चमधून कंपनी भरपूर कमाई करते, पण ChatGPT आल्यानंतर कंपनीच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला. हा प्लॅटफॉर्म लाँच होऊन जवळपास दीड वर्ष झाली आहेत. आता गुगल कंपनी आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये मोठा बदल करण्याच्या विचारात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT