Google Gemini AI eSakal
विज्ञान-तंत्र

Gemini AI : चॅटजीपीटीचं टेन्शन वाढलं! गुगलने बार्डनंतर आता लाँच केलं 'जेमिनी एआय'

हे मॉडेल बार्डपेक्षा अधिक स्मार्ट असल्याचा दावा गुगलने केला आहे.

Sudesh

चॅटजीपीटी लाँच झाल्यापासून जगभरात सगळीकडे एआयची चर्चा सुरू आहे. कित्येक दिग्गज कंपन्यांनी आपलं एआय मॉडेल लाँच केलं आहे. या शर्यतीत आता गुगलनेही उडी घेतली आहे. गुगलने आपलं अ‍ॅडव्हान्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मॉडेल 'जेमिनी एआय' लाँच केलं आहे.

हे मॉडेल बार्डपेक्षा अधिक स्मार्ट असल्याचा दावा गुगलने केला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं, की हे मॉडेल मानवी संवादाने प्रेरित झालेलं आहे. म्हणजेच, माणसं ज्याप्रमाणे एकमेकांशी संवाद साधतात, ते पाहून या एआय मॉडेलला डेव्हलप करण्यात आलं आहे.

डीपमाईंड आणि गुगल रिसर्च टीमने मिळून हे एआय तयार केलं आहे. टेक्स्ट, इमेज, ऑडिओ आणि कोडिंग असे सर्व प्रकारचे टास्क जेमिनी पार पाडू शकते. हे एआय तीन साईजमध्ये उपलब्ध होणार आहे. 'अल्ट्रा' व्हर्जन हे जटिल आणि गुंतागुंतीची कार्ये करण्यासाठी असणार आहे. 'प्रो' व्ह्जन हे अनेक कामं एका वेळी करण्यासाठी असणार आहे. तर 'नॅनो' व्हर्जन हे ऑन डिव्हाईस कामं करण्यासाठी असणार आहे.

बार्डमध्ये होणार उपलब्ध

गुगल असिस्टंट आणि बार्डचे उपाध्यक्ष सिसी हसियाओ यांनी सांगितलं, की जेमिनी एआय हे 'बार्ड'मध्ये दोन टप्प्यांमध्ये लाँच होईल. 6 डिसेंबरपासून बार्डला जेमिनी प्रो मधील एका विशिष्ट व्हर्जनच्या मदतीने चालवले जाईल. यामुळे बार्ड हा चॅटबॉट एखादी गोष्ट समजून घेणे, सारांश काढणे, तर्क करणे, कोडिंग करणे आणि योजना आखणे या गोष्टींमध्ये अधिक सक्षम होईल.

नवीन वर्षापासून गुगल बार्डमध्ये जेमिनी एआय अल्ट्रा व्हर्जनचा सपोर्ट मिळेल. मल्टिमॉडेल रिझनिंग क्षमता असल्यामुळे जेमिनी अल्ट्रा हे जगातील सर्वात लोकप्रिय कोडिंग लँग्वेजमध्ये हाय क्वालिटी कोड समजून घेऊ शकते, ते कोड समजावू शकते आणि नवीन कोड तयार करू शकते.

170 देशांमध्ये मिळणार

बार्डमध्ये जेमिनी प्रो व्हर्जन हे सुरुवातीला टेक्स्ट बेस्ड प्रॉम्प्टला सपोर्ट करेल. यानंतर त्यात मल्टिमॉडेल सपोर्ट मिळणार आहे. हे नवीन एआय 170 पेक्षा अधिक देशांमध्ये उपलब्ध असेल. सुरुवातीला हे केवळ इंग्रजीत उपलब्ध असेल, मात्र नजीकच्या भविष्यात इतर भाषांचा सपोर्ट देखील देण्यात येईल, असं गुगलने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT