Govt. Alert esakal
विज्ञान-तंत्र

Govt. Alert : 'हे' सर्च इंजीन वापरत असाल तर वेळीच व्हा सावध, सरकारनेच दिला इशारा

जर तुम्ही Microsoft Edge हे सर्च इंजीन वापरत असाल तर आताच व्हा सावध. नाहीतर मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Govt. Alert About Microsoft Edge : जर तुम्ही ऑनलाइन गोष्टींना सर्च करत असाल तर सावध व्हा. सकारने एक चेतावनी दिली आहे. हा इशारा विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे वेब ब्राउझर Microsoft Edge चा वापर करतात. Microsoft Edgeमध्ये एक मोठा बग डिटेक्ट झाला आहे. यामुळे युझरच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. अशात सरकारने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

Microsoft Edge मधली कमतरता

CERT-IN वेबसाइटच्या वतीने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी Microsoft Edge Chromium बग डिटेक्ट केला आहे. ज्याचा दूरुपयोग करून हॅकर्स सिक्युरीटीला बायपास करून सिस्टीम हॅक करू शकतो. तुमची माहिती चोरी करू शकतात. या शिवाय दुसऱ्या मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरला हॅकिंगचा मेसेज पाठवून पैशांची डिमांड करू शकतात. Microsoft Edge ब्राउजर वर्जन 109.0.1518.61 यात ही कमतरता आहे.

कसं टाळावं?

CERT-IN च्या रिपेर्टनुसार या कमतरतेतून वाचण्यासाठी Microsoft Edge ब्राउंजर ताबडतोब अपडेट करावं यासाठी मायक्रोसॉफ्ट वेब ब्राउझर कडून नवीन व्हर्जनपण देण्यात आलं आहे.

कसं करावं अपडेट?

  • मायक्रोसॉफ्ट वेब ब्राउझर ओपन करा.

  • उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करुन सेटींग ऑप्शनवर जा.

  • About Microsoft Edge ऑप्शन वर क्लिक करा.

  • त्यानंतर अपडेटच्या ऑप्शनवर क्लिक करून अपडेट करा.

  • शेवटी ब्राउझर रिस्टार्ट करा.

CERT-IN काय आहे?

CERT-IN ही एक केंद्रीय एजंसी आहे. याचा लाँगफॉर्म कम्प्युटर इमर्जंसी रिस्पाँस टीम असा आहे. CERT-IN २०२३ मध्ये सुरु करण्यात आलं. ही एक नोडल एजंसी आहे. जी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत काम करते. ही वेळोवेळी सायबर अॅटॅक संदर्भात अलर्ट देत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT