Google search Sakal
विज्ञान-तंत्र

Google Search: एकनाथ शिंदेंची हवा! सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत अ‍ॅम्बर हर्डला टाकलं मागे

गुगलने वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉप-१० भारतीय व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google's Year in Search 2022: सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलवर आपण असंख्य गोष्टी सर्च करत असतो. खासकरून, भारतीय लोक गुगलवर असंख्य विचित्र गोष्टी सर्च करत असतात. २०२२ मध्ये काही भारतीय व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे विशेष चर्चेत होत्या. २०२२ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस बाकी असून, या निमित्ताने गुगलने वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तींची लिस्ट जारी केली आहे.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

गुगलच्या या लिस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते अभिनेत्री सुश्मिता सेनचा देखील समावेश आहे. सुश्मिता सेन आणि आयपीएले माजी चेअरमॅन ललित मोदी यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे ते दोघं चर्चेत आले होते. याशिवाय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

२०२२ मध्ये गुगलवर या १० भारतीय व्यक्तींचीच चर्चा

  1. नुपूर शर्मा

  2. द्रौपदी मुर्मू

  3. ऋषी सुनक

  4. ललित मोदी

  5. सुश्मिता सेन

  6. अंजली अरोरा

  7. अब्दु रोझिक

  8. एकनाथ शिंदे

  9. प्रविण तांबे

  10. अ‍ॅम्बर हर्ड

२०२२ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तींमध्ये माजी भाजप नेत्या नुपूर शर्मा टॉपवर आहेत. नुपूर शर्मा या इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याशी संबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. लिस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठव्या क्रमांकावर आहेत. जॉनी डेप आणि त्याची पूर्वपत्नी अ‍ॅम्बर हर्ड यांच्या वादाची देखील यावर्षी विशेष चर्चा झाली. अ‍ॅम्बर हर्डने देखील या यादीत स्थान मिळवले आहे. याशिवाय क्रिकेटपटू प्रविण तांबे, सोशल मीडिया स्टार अब्दु रोझिक आणि अंजली अरोरा यांनी देखील लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E. Coli Bacteria: मुंबई रेल्वे स्थानकातील पाणी पिताय, जरा जपून! मध्य रेल्वेच्या ३ स्थानकात पाण्याच्या टाकीत आढळतोय 'हा' भयानक विषाणू

IND vs SL 1st Test: 'आता, सर्व तलवार चालवणार!'; रिषभ पंत लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजाला असं का म्हणाला? Video Viral

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बांगलादेशी ताब्यात; अनधिकृत वास्तव्य उघड, ढाब्यावर कुक-वेटर म्हणून काम, धक्कादायक सत्य समोर..

Marathi News Live Updates : रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती

Nag Panchami 2026: पृथ्वीवर नागकुळाची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या नागदेवतेच्या जन्माची अद्भूत कथा..

SCROLL FOR NEXT