Monsoon Gadgets Care: Sakal
विज्ञान-तंत्र

Monsoon Gadgets Care: पावसाळ्यात कॅमेरा, मोबाईल, लॅपटॉप भिजल्यास 'कशी' घ्याल काळजी, वाचा एका क्लिकवर

Monsoon Gadgets Care: पावसाळ्यात मोबाईल, लॅपटॉप भिजण्यापासून कसे रोखाल, वाचा सविस्तर

Puja Bonkile

पावसाळ्यात गॅझेट्सची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा भिजल्यास लगेच बंद करून स्वच्छ सुती कापडाने पुसावे.

प्लास्टिक पिशवीत ठेवून सुरक्षितता वाढवावी. तांदळाचा वापर करून गॅझेट्स कोरडे करणे उपयुक्त ठरते.

Monsoon Gadgets Care: देशभरात पावसाने अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. अशात आरोग्याबरोबर गॅझेटची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही ऑफिसला जाताना किंवा घरी येताना पावसात मोबाईल, लॅपटॉप भिजले असेल तर कोणती काळजी घ्यावी हे जाणू घेऊया.

पावसाळ्यात मोबाईलची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण मोबाईलचा जास्त वापर केला जातो. पावसाळ्यात मोबाईलसाठी प्लास्टिक पिशवी किंवा पाऊच वापरावे. पावसाळ्यात मोबाईल खिशात किंवा बॅगमध्ये ठेऊ नका. खुप महत्वाचा कॉल असेल तरच मोबाईलचा वापर करावा अन्यथा करू नका.

पावसाळ्यात लॅपटॉपची खास पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. लॅपटॉपला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणे योग्य राहील. पावसाळ्यात तुमचा लॅपटॉप, मोबाईल किंवा कॅमेरा भिजल्यास लगेच बंद करावा. तसेच स्वच्छ सुती कापडाने पुसावे. तसेच मेमरी कार्ड, सिम कार्ड, विविध भाग सुटे करून कोरडे करावे.

मोबाईल किंवा कॅमेरामध्ये पाणी गेल्यास जोरात हलवावे. त्यातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. यानंतर टॉवेल, टिश्यू किंवा वर्तमानपत्राचा वापर करून या वस्तू कोरड्या कराव्या.

अनेक लोका गॅझेट्स पाण्यात भिजल्यास हेअर ड्रायरचा वापर करतात. पण असे करणे चुकीचे आहे. कारण गरम हवेमुळे गॅझेट खराब होऊ शकतात. याशिवाय तुम्ही तांदळाचा वापर करू शकता. ओले झाले तर गॅझेट तांदळात ठेवावे. या पद्धतीचा वापर केल्याने मोबाईल कोरडे होईल. मोबाईल बाहेर काढल्यावर लगेच चालू करू नका. संपुर्ण कोरडे झाल्यावरच चालू करावा.

पावसाळ्यात स्मार्ट वॉच भिजल्यास लगेच सुती कापड्याने कोरडी करावी. तुम्ही बाहेर जात असाल आणि अचानक पाऊस आला तर हातातील स्मार्ट वॉच लगेच प्लास्टिक पिशवीत ठेवावी.

पावसाळ्यात मोबाईल भिजल्यास काय करावे?

उत्तर: मोबाईल बंद करा, सिम आणि बॅटरी (शक्य असल्यास) काढा, कोरड्या कपड्याने पुसा आणि 24-48 तास तांदूळ किंवा सिलिका जेलमध्ये ठेवा.

कॅमेरा भिजला तर त्याची काळजी कशी घ्यावी?

उत्तर: कॅमेरा बंद करा, लेन्स आणि बॅटरी काढा, कोरड्या कपड्याने पुसून सिलिका जेल किंवा तांदळात ठेवा आणि तज्ज्ञांकडून तपासणी करा.

लॅपटॉप पाण्यात भिजल्यास काय करावे?

उत्तर: लॅपटॉप बंद करा, पॉवर केबल आणि बॅटरी काढा, कोरड्या कपड्याने पुसा आणि हवेशीर ठिकाणी किंवा सिलिका जेलमध्ये 48 तास ठेवा.


इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स पावसापासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करावेत?

उत्तर: वॉटरप्रूफ कव्हर वापरा, गॅझेट्स झिपलॉक बॅगमध्ये ठेवा, पावसात वापर टाळा आणि नियमित बॅकअप घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

SCROLL FOR NEXT