AC Light Bill eSakal
विज्ञान-तंत्र

AC Light Bill : उन्हाळ्यात एसीमुळे येतंय भरमसाठ लाईट बिल? 'या' टिप्स फॉलो कराल तर होईल मोठी बचत

अनेकदा लोक स्वस्तात मिळतोय म्हणून 2 स्टार किंवा 3 स्टार एसी खरेदी करतात. मात्र हा एसी पुढे जाऊन महागात पडतो.

सकाळ डिजिटल टीम

Electricity Bill Saving Tips : यंदाच्या वर्षी अगदी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरा-घरांमध्ये सतत एसी सुरू असलेला दिसत आहे. यामुळे उकाडा कमी होत असला, तरी वीज बिल वाढत असल्याचं दिसत आहे. एसीचा वापर कायम ठेऊनही जर वीज बिल कमी करायचं असेल, तर काही टिप्स तुम्ही ट्राय करू शकता.

एसी घेताना स्टार रेटिंग पाहा

अनेकदा लोक स्वस्तात मिळतोय म्हणून 2 स्टार किंवा 3 स्टार एसी खरेदी करतात. मात्र हा एसी पुढे जाऊन महागात पडतो. जुन्या मॉडेलचा एसी खरेदी केल्याने वीजेचा वापर लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत वीज बिलही जास्त येते. त्यामुळे एसी घेताना थोडा महाग पडला, तरीदेखी चांगल्या ब्रँडचा 5 स्टार एसी घेण्याला प्राधान्य द्यावं. (5 Star AC)

योग्य तापमान गरजेचं

योग्य तापमानात एसी चालवल्यास विजेच्या बिलात नक्कीच बचत होईल. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार, आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम तापमान 24 अंश सेल्सिअस आहे. या तापमानात एसी वापरल्यास तुमचे बिल नक्कीच कमी होईल. अनेक वेळा एसीचे तापमान कमी करून लोक झोपतात, त्यामुळे वीज बिलही वाढते. (AC ideal temperature)

मेन स्विच अन् टायमर

अनेक वेळा लोक एसी बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करतात. मात्र मेन स्वीच बंद करायला विसरून जातात. फक्त एसी बंद करून चालणार नाही, तर मेन स्विचही बंद करावा लागेल, नाहीतर वीज बिल जास्त येऊ शकते.

यासोबत, जर तुम्ही रात्री एसी वापरत असाल तर तुम्ही टायमर सेट करू शकता. यामुळे तुमचा एसी निर्धारित वेळेनंतर आपोआप बंद होईल. पर्यायाने विजेचा वापरही कमी होईल. (How to set AC timer)

खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा

एसी चालवताना हेही लक्षात ठेवा की तुम्ही ज्या खोलीत एसी चालवत आहात, त्या खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असले पाहिजेत. यामुळे तुमच्या घराला पुरेसे कूलिंग मिळेल आणि कूलिंगसाठी जास्त वेळ एसी चालवावा लागणार नाही.

यासोबतच एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं देखील महत्त्वाचं आहे. जुने झालेले एसी अधिक एनर्जी खर्च करतात आणि त्यामुळे वीज बिल देखील वाढतं. मात्र, वेळोवेळी सर्व्हिसिंग केल्यास एसी नव्यासारखा राहतो आणि पर्यायाने कमी उर्जा वापरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT