Pran Pratishtha Live eSakal
विज्ञान-तंत्र

Pran Pratishtha Live Telecast : घरबसल्या घ्या रामलल्लाचं दर्शन; कुठे अन् कसं पाहता येईल प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण?

जगभरातील श्रीरामभक्त ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस आज आला आहे. अवघ्या काही तासांमध्येच अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

Sudesh

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony Live : जगभरातील श्रीरामभक्त ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस आज आला आहे. अवघ्या काही तासांमध्येच अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या भव्य-दिव्य अशा सोहळ्याचं याचि देही याचि डोळा दर्शन घेता यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र सर्वांनाच अयोध्येत उपस्थित राहणं शक्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील देशभरातील नागरिकांना आवाहन केलं आहे, की त्यांनी 22 जानेवारीला अयोध्येत न येता, घरीच दिवाळी साजरी करावी. अयोध्येतील या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही घरबसल्या देखील हा सोहळा पाहू शकता. या सोहळ्याला लाईव्ह पाहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

दूरदर्शन

जर तुम्हाला टीव्हीवर हा कार्यक्रम पहायचा असेल, तर 22 जानेवारी रोजी सकाळपासूनच दूरदर्शनवर याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स पोहोचवण्यासाठी दूरदर्शनची टीम तैनात असणार आहे. यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी दूरदर्शनचे सुमारे 40 कॅमेरे लावण्यात येतील. सकाळी 11 वाजेपासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. तुमच्याकडे दूरदर्शन चॅनल HD मध्ये उपलब्ध असेल, तर 4K HD क्लॅरिटीसह देखील तुम्ही हा सोहळा पाहू शकाल.

मोबाईलवर कसा पहायचा कार्यक्रम?

  • मोबाईलवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यूट्यूबवर दूरदर्शनच्या चॅनलवर देखील याचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. डीडी न्यूजवर देखील याचं प्रक्षेपण करण्यात येईल.

  • इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिर ट्रस्टचे अधिकृत अकाउंट तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.

  • जिओ सिनेमा या अ‍ॅपवर प्राण-प्रतिष्ठा नावाचं सेक्शन तयार करण्यात आलं आहे. याठिकाणी देखील तुम्ही या भव्य सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT