Aditya L1 Mission LIVE eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 : 'आदित्य एल-1'चे काउंटडाऊन सुरू; कसं आणि कुठे पाहता येईल लाईव्ह? जाणून घ्या

ISRO Sun Mission : ही भारताची पहिलीच सौर मोहीम असणार आहे.

Sudesh

ISRO Aditya L1 : भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम लाँच होण्यासाठी आता काही तासांमध्येच लाँच होईल. शनिवारी (2 सप्टेंबर) सकाळी 11:50 मिनिटांनी 'आदित्य एल-1' उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल. यासाठीचं काउंटडाऊन आज सुरू झालं आहे. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी याचा काउंटडाऊन सुरू झाला. 23 तास 40 मिनिटांचा हा काउंटडाऊन असणार आहे. आदित्यच्या प्रक्षेपणासाठी इस्रो आपलं विश्वासार्ह पीएसएलव्ही-एक्सएल हे रॉकेट वापरेल.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

देशाच्या पहिल्याच सौर मोहिमेचं लाँचिंग थेट पाहून, तुम्हीही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ शकता. इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर, अधिकृत यूट्यूब चॅनल, अधिकृत फेसबुक पेज आणि एक्स हँडलवर याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

तुम्ही टीव्हीवर देखील या यानाचं प्रक्षेपण पाहू शकता. DD National या टीव्ही चॅनलवर हे लाईव्ह दाखवण्यात येईल. उद्या (शनिवार) सकाळी 11.20 मिनिटांनी थेट प्रक्षेपणास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती इस्रोने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

काय आहे मोहीम?

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची ही पहिलीच मोहीम असणार आहे. यामध्ये आदित्य नावाचा उपग्रह, पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येईल. याठिकाणाहून विना अडथळा आदित्य सूर्याचं निरीक्षण आणि अध्ययन करू शकणार आहे. या पॉइंटच्या वैशिष्ट्यामुळे आदित्यला याठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी अगदी कमी इंधनाची गरज भासणार आहे.

कोरोनल हीटिंग, सौर वादळे, कोरोनाल मास इंजेक्शन, फ्लेअर्स पृथ्वीच्या जवळील अंतराळ हवामान, सूर्यावरील वातावरण आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आदित्य करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

SCROLL FOR NEXT