Ram Mandir From Space eSakal
विज्ञान-तंत्र

Ayodhya Ram Mandir From Space : अंतराळातून कसं दिसतंय अयोध्येतील राम मंदिर? इस्रोने टिपला भन्नाट फोटो!

ISRO Ram Mandir Pics : इस्रोने चक्क अंतराळातून या मंदिराचा फोटो टिपला आहे. सॅटेलाईट कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे मंदिर कसं दिसतंय, हे या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.

Sudesh

Ayodhya Ram Mandir Picture from Space : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला आता काही तास शिल्लक आहेत. यादरम्यान भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चक्क अंतराळातून या मंदिराचा फोटो टिपला आहे. सॅटेलाईट कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे मंदिर कसं दिसतंय, हे या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो डिसेंबर महिन्यातील आहे. धुक्यामुळे हा फोटो थोडा अस्पष्ट असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. या फोटोमध्ये शरयू नदी, दशरथ महाल, नव्याने तयार केलेलं अयोध्येतील रेल्वे स्टेशन अशी ठिकाणंं दिसत आहेत. (ISRO Ram Mandir Pics)

गुगल सॅटेलाईट व्ह्यू

दरम्यान, गुगल अर्थवर सॅटेलाईट व्ह्यूमध्ये देखील अयोध्येतील श्रीराम मंदिर पाहता येऊ शकतं. अर्थात, हा फोटो जुना असल्यामुळे यामध्ये बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेन देखील दिसत आहेत. या मंदिराचा परिसर केवढा मोठा आहे याचा अंदाज या फोटोंमधून येतो आहे. तसंच वरच्या अँगलने हे मंदिर कसं दिसतं, हेदेखील यातून पाहता येतंय.

प्राणप्रतिष्ठेची आतुरता

सोमवारी सकाळी 11 वाजेपासून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत मुख्य कार्यक्रम पार पडेल. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी अयोध्येत येऊ नये असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच केलं आहे. हा सोहळा तुम्ही दूरदर्शन, यूट्यूब किंवा पीव्हीआर थिएटरमध्ये लाईव्ह पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT