ISRO fuel Cell eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO : अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी; इस्रोची मोठी कामगिरी!

‘‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा निर्मिती करता येणार असून त्यातून पाणी मिळणार आहे, आणि कोणतेही उत्सर्जन होणार नाही,’’ असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

ISRO Achievement : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी ‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले. अंतराळातील कार्यपद्धती आणि भविष्यातील मोहिमांची सुलभ आखणी करण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे.

‘‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा निर्मिती करता येणार असून त्यातून पाणी मिळणार आहे, आणि कोणतेही उत्सर्जन होणार नाही. भविष्यात अंतराळातील वास्तव्यात ऊर्जा निर्मितीचे हे एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे,’’ असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

विक्रम साराभाई अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही-सी५८’ या प्रक्षेपकाद्वारे या ऊर्जा प्रणालीचे एक जानेवारी रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. १०० वॉट क्षमतेची पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेंबब्रेन फ्युएल सेल (पीओईएम३)’ आधारित या प्रणालीचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. या चाचणीत हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या मदतीने उच्च दाबाच्या उपकरणात १८० वॉट एवढी ऊर्जा निर्माण करण्यात आली.

‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार ‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाच्या मदतीने हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूतून ऊर्जा निर्माण करण्यात आली. यामधून पिण्याचे पाणी मिळाले आणि कोणतेही उत्सर्जनही झाले नाही. ‘हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूतून हायड्रोजन फ्‍युएल सेल थेट वीजनिर्मिती करतात. त्यातून शुद्ध पाणी आणि उष्णताही मिळते.

'आदित्य-एल1’ शेवटच्या टप्प्यात

दरम्यान, भारताची पहिली सौरमोहीम ‘आदित्य -एलवन’ शेवटच्या टप्प्यात आहे. आज यानाचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा कक्षाबदल होणार आहे, असे ‘इस्रो’ने सांगितले. सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समान असलेल्या ‘लॅग्रांज बिंदू वन’ (एलवन) भोवतालच्या प्रभामंडल कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. पृथ्वीपासून ‘एलवन’चे अंतर १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT