PSLV C58 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO XPoSat Launch : नववर्षाची धमाक्यात सुरुवात! 'एक्सपोसॅट' मोहिमेचं यशस्वी उड्डाण; पाहा व्हिडिओ

PSLV C58 : एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग करुन इस्रोने 2024 वर्षाची धमाक्यात सुरुवात केली आहे.

Sudesh

ISRO Xposat Mission : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक मोठी कामगिरी केली आहे. एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग करुन इस्रोने 2024 वर्षाची धमाक्यात सुरुवात केली आहे. या वर्षातील इस्रोची ही पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (ISRO New Mission)

सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर सुमारे 22 मिनिटांमध्ये हा उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. हा उपग्रह अंतराळातील कृष्णविवरे आणि इतर प्रमुख प्रकाश स्त्रोतांचा अभ्यास करणार आहे.

पीएसएलव्ही उपग्रह हा पृथ्वीपासून 650 किलोमीटर उंचीवरील कक्षेत 6 डिग्री अँगलला प्रस्थापित करण्यात आला आहे. यानंतर आता पीएसएलव्ही रॉकेटची कक्षा कमी करण्यात आली आहे. यानंतर आणखी काही वेळ ही मोहीम सुरू राहणार आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून भारताने नवा इतिहास रचला आहे. कृष्णविवरे, न्यूट्रॉन-स्टार आणि अंतराळातील अशा अनेक प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. अशा प्रकारची ही भारताची पहिली आणि जगातील दुसरीच मोहीम आहे.

महिलांनी तयार केलेल्या उपग्रहाचंही प्रक्षेपण

तिरुअनंतपुरम स्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने विकसित केलेला एक उपग्रहदेखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला. सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे असा या उपग्रहाचा उद्देश्य आहे. एक्सपोसॅटला आपल्या कक्षेत सोडल्यानंतर आता टप्प्या टप्प्याने इतर उपग्रह देखील त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT