jio airtel vodafone 
विज्ञान-तंत्र

सर्वात स्वस्त रिचार्जमध्ये मिळवा एक वर्षासाठी डेटा आणि फ्री कॉलिंग

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 04 : टेलिकम्युनिकेशन कंपन्या सध्या ग्राहकांसाठी इंटरनेट डेटा आणि कॉलिंगसाठी मोठ्या ऑफर्स देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोनने युजर्ससाठी लाँग टर्मचे स्वस्तातले प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे युजर्सना पुन्हा पुन्हा रिचार्ज कऱण्याची गरज पडत नाही. तसंच दर महिन्याला केल्या जाणाऱ्या रिचार्जपेक्षा हे प्लॅन स्वस्त आहेत. 
एअरटेलचे एक वर्षासाठी अनेक प्लॅन आहेत. यामध्ये 1499 रुपयांचा प्लॅन स्वस्त आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवस असून युजर्सना 24 जीबी डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येतं. तसंच 3600 एसएमएस मिळतात.

Remove China App गुगल प्ले स्टोअरवरून हटवले

वोडाफोनचाही प्लॅन एअरटेल प्रमाणेच आहे. 1433 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभऱासाठी 24 जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग मिळतं. त्यासोबत 3600 एसएमएसही फ्री मिळतात. वोडाफोन प्ले आणि झी5 अॅपचे सबस्क्रिप्शनसुद्धा युजर्सना मोफत मिळते.

रिलायन्स जिओचा 1299 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 11 महिन्यांची मुदत मिळते. जिओचा हा प्लॅन 336 दिवसांसाठी असून यात जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 12000 नॉन जिओ मिनिटे मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Arya Avdhut Success Story : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; आर्या अवधूतचा राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजय

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT