Mukesh ambani
Mukesh ambani esakal
विज्ञान-तंत्र

Jio 5G Phone : रिलायन्स जिओचा स्वस्तातील 5G फोन, जाणून घ्या फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Jio 5G Phone : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM 2022) आज पार पडली. या बैठकीत Jio 5G सेवा लॉन्च करण्याची घोषणा करण्यासोबतच कंपनीने Jio Phone 5G लाँच करण्याचीही घोषणा केली आहे. हा फोन पुढील वर्षी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. Jio Phone 5G गूगल (Google) आणि क्वॉलकॉम (Qualcomm) भागीदारीत लॉन्च केला जाणार आहे. 5G कनेक्टिव्हिटीसह हा सर्वात स्वस्त फोनदेखील असेल. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसरसह सादर केला जाणार असून, या फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Jio Phone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन

Jio Phone 5G च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात 6.5 इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले असेल. जो 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह असेल. फोनला स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर आणि 4 GB रॅमसह 32 GB स्टोरेज देण्यात येणार आहे. हा सर्वात स्वस्त 5G प्रोसेसर आहे.

फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Jio Phone 5G मध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी लेन्स आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच 5,000mAh बॅटरी असू शकते. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील फोनमध्ये असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दीवाळी होणाप 5G चा धमाका

रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातील जिओ 5G इंटरनेट सेवा ही देशातील फक्त चार मुख्य शहरात सुरू होणार असून, पुढील वर्षापर्यंत संपूर्ण देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 5G मुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचंही मुकेश अंबानी यांनी सांगितल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT