KundaliGPT eSakal
विज्ञान-तंत्र

KundaliGPT : आता ज्योतिषाकडे जायची गरज नाही! एआय देईल तुमच्या प्रश्नांची उत्तरं; काय आहे 'कुंडली-जीपीटी'?

AI for Kundali : हा वेदिक अ‍ॅस्ट्रॉलॉजर चॅटबॉट यूजर्सच्या आयुष्याबाबत प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहे.

Sudesh

Kundali GPT : घरामध्ये शुभकार्य असेल, नोकरी किंवा विवाहासंबंधी काही प्रश्न असतील तर कित्येक लोक ज्योतिषांकडे जातात. आपल्या कुंडलीमध्ये काही दोष तर नाही ना हे विचारण्यासाठी लोक ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्या व्यक्तींची मदत घेतात. मात्र, आता हेच काम एआय देखील करू शकणार आहे.

लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता KundaliGPT हा एआय चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. हा वेदिक अ‍ॅस्ट्रॉलॉजर चॅटबॉट यूजर्सच्या आयुष्याबाबत प्रश्नांची ज्योतिषशास्त्रानुसार उत्तरं देऊ शकणार आहे. यासाठी केवळ आपली काही माहिती या चॅटबॉटला सांगावी लागणार आहे.

टेक्नॉलॉजीला शास्त्राची जोड

वैदिक शास्त्रातील माहितीच्या आधारे हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. ग्रहांची दशा, कुंडलीमध्ये त्यांची उपस्थिती अशी माहिती पाहून हा एआय चॅटबॉट आपल्याला प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. यासाठी आधीच फीड केलेली ज्योतिष्यशास्त्रातील माहितीची तो मदत घेतो.

असा करता येईल वापर

या चॅटबॉटचा वापर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी KundaliGPT.com या वेबसाईटवर जायचं आहे. यानंतर 'गेट स्टार्टेड' हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला तुमचं नाव, जन्मदिन, जन्माची वेळ आणि जन्माचे स्थान अशी माहिती भरावी लागेल.

जन्मस्थान निवडण्यासाठी यामध्ये मॅपचं फीचरही आहे. या मॅपच्या मदतीने तुम्ही तुमचं जन्मस्थान सिलेक्ट करू शकता. यानंतर तुम्हाला 'जनरेट कुंडली' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

हे केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमची कुंडली दिसेल. या कुंडली चार्टखाली चॅटबॉट देखील उघडेल. या चॅट-बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या जीवनासंबंधी प्रश्न विचारू शकता. कुंडलीतील माहितीनुसार हा चॅटबॉट तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT