Saraswati Supercluster 
विज्ञान-तंत्र

पृथ्वीजवळ असणाऱ्या 'सरस्वती' दीर्घिका समूहाचा शोध!

स्वप्नील जोगी

पुणे : पृथ्वीपासून सुमारे 4 अब्ज प्रकाशवर्षं दूर असणाऱ्या 'सरस्वती' या दीर्घिकांच्या एका प्रचंड मोठ्या समूहाचा (सुपरक्‍लस्टर) शोध लावण्यात पुण्यातील 'आयुका' आणि 'आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांच्या टीमला यश आले आहे. विश्वात अशा प्रकारच्या प्रचंड आकाराच्या खगोलीय रचनेचा शोध ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असून, भारतातर्फे असा शोध प्रथमच लावण्यात आला आहे. 

भारतीय शास्त्रज्ञांचे पथक गेली पंधरा वर्षे या दीर्घिका समूहाविषयी माहिती मिळवीत होते. अखेरीस या समूहाचे स्थान, त्याची रचना आणि पृथ्वीपासूनचे अंतर निश्‍चित झाल्यावर हा शोध जाहीर करण्यात आला. सरस्वती या दीर्घिका समूहात एकाचवेळी हजारो दीर्घिकांच्या समावेश आहे. त्यातील कित्येक आपल्या आकाशगंगेच्या आकाराहून प्रचंड मोठ्या देखील आहेत. रेवती नक्षत्राच्या दिशेने हा समूह स्थित आहे.

'स्लोअन डिजिटल स्काय सर्वे'च्या आधारे हा शोध लावण्यात आला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकन अस्ट्रोनॉमीकल सोसायटीच्या 'द अस्ट्रॉफीजिकल जर्नल' या मानाच्या नियतकालिकाच्या येत्या अंकात हा संशोधन प्रबंध छापून येणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची हे त्याचे प्रमुख लेखक असणार आहेत. 

या शोधाविषयी माहिती देताना आयसर मधील संशोधक शिशिर सांख्ययन म्हणाले, 'हा एक महत्त्वाचा शोध म्हणायला हवा. विश्वाची उत्पत्ती आणि त्यासंदर्भातील विविध खगोलीय घटनांचा अभ्यास करणे यामुळे अधिक पुढच्या टप्प्यावर पोचू शकेल. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून यापुढील अनेक रहस्य उलगडू शकतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT