Maruti Suzuki Air copter eSakal
विज्ञान-तंत्र

Maruti Suzuki Air copter : मारुती-सुझुकी बनवतंय चक्क इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर; पुढील वर्षी होणार सादर - रिपोर्ट

मारुती सुझुकी या एअर कॉप्टरची निर्मिती भारतात करू शकते असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी करण्यासाठी कंपनी हा निर्णय घेऊ शकते.

Sudesh

Maruti Suzuki Electric Air copter Skydrive : भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल निर्माती कंपनी मारुती-सुझुकी आता हवाई क्षेत्राला लक्ष्य करणार आहे. ही कंपनी आता इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर बनवण्याच्या तयारीत आहे. हे एअर कॉप्टरचा आकार नेहमीच्या हेलिकॉप्टरपेक्षा लहान असणार आहे, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येतंय.

टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, या एअर कॉप्टरमध्ये पायलट आणि आणखी दोन जणांना बसण्याची क्षमता असू शकते. याचा वापर मुख्यत्वे एअर-टॅक्सी म्हणून केला जाऊ शकतो. सुरुवातीला केवळ जपान आणि अमेरिकेत हे एअर कॉप्टर उपलब्ध करण्यात येतील. मात्र, भविष्यात भारतात देखील ही सेवा सुरू केली जाऊ शकते. (Maruti Suzuki Electric Helicopter)

मेड इन इंडिया

मारुती सुझुकी या एअर कॉप्टरची निर्मिती भारतात करू शकते असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी करण्यासाठी कंपनी हा निर्णय घेऊ शकते. यासाठी कंपनीची डीजीसीएसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती सुझुकी ग्लोबल ऑटोमोबाईल प्लॅनिंग विभागाचे सहाय्यक प्रबंधक केंटो ओगुरा यांनी टाईम्सला दिली. (Suzuki Electric Air copter)

स्कायड्राईव्ह

मारुती सुझुकी इलेक्ट्रिक एअरकॉप्टरला 'स्कायड्राईव्ह' (Skydrive) असं नाव देण्यात येईल. यामध्ये मोटर आणि रोटर्सचे 12 युनिट्स असतील. पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या 2025 ओसाका एक्स्पोमध्ये याचं मॉडेल सादर करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. हे हेलिकॉप्टर इलेक्ट्रिक असल्यामुळे याचं वजन तुलनेने कमी आहे. पारंपारिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत याचं वजन निम्मं असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेलिकॉप्टर स्वस्त होण्याची गरज

केंटो म्हणाले, की हेलिकॉप्टर निर्मितीचा खर्च कमी होण्याची गरज आहे. कंपनी सध्या भारतात एअर कॉप्टर मार्केट आणि त्याची मागणी कशी आहे याबाबत रिसर्च करत आहे. भारतात हे नॉर्मलाईज करायचं असेल, तर एअर कॉप्टर स्वस्त होण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT