Microsoft Windows Outage funny memes viral on Social Media latest marathi news  
विज्ञान-तंत्र

Microsoft Windows Outage : आग लगे बस्ती मे...; मायक्रोसॉफ्ट क्रॅश झाल्यानंतर कॉर्पोरेट कर्मचारी खूश; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Microsoft Windows Global Outage Viral Memes : मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे जगभरात लॅपटॉप आणि कंप्युटर डाउन झाले आहेत. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात खळबळ उडाली असून अनेक महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.

रोहित कणसे

मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे जगभरात लॅपटॉप आणि कंप्युटर डाउन झाले आहेत. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात खळबळ उडाली असून अनेक महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. असे असताना काही लोकांना मात्र या संधीचं सोनं केल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर यासंबंधी मीम्सचा महापूर आला आहे. लोक अनेक मजेशीर मीम्स इंटरनेटवर पोस्ट करत आहेत.

या आऊटेज दरम्यान मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटले आहे की ते Microsoft 365 ॲप्स आणि सेवांवर परिणाम करणारी समस्या दूर केली जात आहे. मात्र, या समस्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मायक्रोसॉफ्टने सोशल मीडिया 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, परिस्थिती सुधारत आहे. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतर देखील जगभरातून अडचणी येत असल्याच्या बातम्या येत आहेत. डाउनडिटेक्टर या इंटरनेट आउटेजेसवर लक्ष ठेवणारी वेबसाइटने सांगितले की व्हिसा, एडीटी सिक्युरिटी आणि ॲमेझॉन यासह अमेरिकन एअरलाइन्स आणि डेल्टा यासह विविध एअरलाइन्स सेवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र युजर्स चांगलीच मजा घेत आहेत. एकापेक्षा एक भन्नाट मीम्स, पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्या पाहून तुम्हालाही हसू येईल. ऑफिसमध्ये काम बंद पडल्यामुळे सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत. . कामाच्या या ब्रेक दरम्यान लोक मिम्मावर खूप कमेंट करत आहेत.

प्रत्येक कंपनीतील आयटी विभाग-

मायक्रोसॉफ्ट क्रॅशनंतर ऑफिसमध्ये लोक रिकाम्या वेळाचा आनंद घेत आहेत

लोक मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यानंतर कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या भावना-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT