Microsoft Windows Crash Sakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Windows Crash: तुमचाही लॅपटॉप बंद पडलाय? जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोज झाले क्रॅश, विमानसेवा सुद्धा थांबली, काय घडलंय नेमकं?

Microsoft Windows: जगभरातील संगणक आणि लॅपटॉप सध्या ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडत आहेत. प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike ने एक अपडेट सांगितली, ज्यानंतर MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश होत आहेत.

राहुल शेळके

Microsoft Windows: जगभरातील संगणक आणि लॅपटॉप सध्या ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडत आहेत. प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike ने एक अपडेट सांगितली, ज्यानंतर MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश होत आहेत.

काम करत असताना लॅपटॉप अचानक बंद होत आहेत आणि त्यानंतर यूजर्सना निळा स्क्रीन दिसत आहे. स्क्रीनवर सांगितले जात आहे की तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेलाच ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) म्हटले जात आहे.

CrowdStrike ने एक निवेदन जारी केले

या समस्येमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे लॅपटॉप आणि संगणक प्रभावित झाले आहेत. CrowdStrike ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. CrowdStrike च्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की विंडोज चालवणाऱ्या मशीनवर BSOD समस्या निर्माण झाली आहे.

जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ची समस्या येत असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःहून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना येण्याची वाट पहा. CrowdStrike सध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट करेल.

शुक्रवारी सकाळी क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

अनेक युजर्स याबाबत तक्रार करत आहेत. या समस्येमुळे लाखो युजर्सवर मोठा परिणाम झाला आहे. बरेच युजर्स तक्रार करत आहेत की त्यांची सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा त्यांना ब्लू स्क्रीन समस्येचा सामना करावा लागत आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवर त्याचा परिणाम होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT