Motorola Moto G62 India launch is on August 11 check price and specifications rak94
Motorola Moto G62 India launch is on August 11 check price and specifications rak94 
विज्ञान-तंत्र

Motorola Moto G62 : भारतात 11 ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या सर्व काही

सकाळ डिजिटल टीम

सध्या सर्वच कंपन्या त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहेत, यादरम्यान तुम्ही देखील 5G स्मार्टफोन खेरदी करण्याचा विचार करत असाल तर Motorola भारतात आपला Moto G62 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने या फोनची लॉंच डेट कंन्फर्म केली आहे. हा हँडसेट येत्या 11 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल.

लेनोवोच्या मालकीचा असलेल्या ब्रँडने आपल्या ट्विटर हँडलवर फोनचा टिझर पोस्ट केला आहे. यासोबतच एक मायक्रोसाइट ई-कॉमर्स पोर्टल फ्लिपकार्टवर लाइव्ह झाली, ज्यामध्ये फोनची फीचर्स समोर आले आहेत. हा फोन फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Moto G62 हा Moto G71 आणि G82 नंतर मोटोरोलाचा भारतातील G-सिरीजमधील तिसरा 5G हँडसेट असेल. हा जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त 5G फोनपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 695 SoC आणि 120Hz डिस्प्लेसह बजेट सेगमेंटमध्ये हा फोन बेस्ट ऑप्शन आहे.

Moto G62 5G स्पेसिफिकेशन्स

Moto G62 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडरसह पंच-होल कट-आउट देण्यात आला आहे. तसेच या हँडसेटमध्ये 6.5-इंच फुल-एचडी + (1080x2400 पिक्सेल) IPS LCD पॅनेल आहे. युरोपमध्ये हा फोन मिडनाईट ग्रे आणि फ्रॉस्टेड ब्लू कलर ऑप्शन्स सादर करण्यात आला आहे.

Moto G62 ट्रिपल रियर कॅमेरा युनिट देण्यात आले आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.समोर, यात 16MP सेल्फी स्नॅपर दिलेला आहे. भारतात, Moto G62 स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारे समर्थित असेल, फोन 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. यात 15W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाइसमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर देखील आहेत.

Moto G62 ची अपेक्षित किंमत

भारतातील Moto G62 ची अधिकृत किंमत आणि उपलब्धता डिटेल्स त्याच्या लॉन्चच्या वेळी घोषित केला जाईल. मात्र, देशात त्याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT