डेटिंग अँपवरून ओळख करून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Fraud : डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, गिफ्टच्या मोहात गमावले लाखो रुपये!

Mumbai Cyber Crime : मँचेस्टरमधील डॉक्टर असल्याचे सांगून फसवणूक, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू!

सकाळ वृत्तसेवा

Social Media Fraud : हल्ली ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया वरून फसवणुकीचे प्रकार सतत घडत आहेत. अश्यातच मुंबईच्या चर्चगेट परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय योगा शिक्षिकेची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्यांची एका व्यक्तीशी डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्या व्यक्तीने शिक्षिकेची ₹३.३६ लाख इतकी रक्कम फसवून घेतल्याची घटना समोर आली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची Tinder नावाच्या डेटिंग अ‍ॅपवरून "अमित कुमार" नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. अमित कुमार हा इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहणारा डॉक्टर असल्याचे सांगत होता. दोघांमध्ये काही दिवसांपासून चॅटिंग सुरू झाली. त्यानंतर फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि व्हॉट्सॲपवरूनही बोलणे सुरू झाले.

एप्रिल २५ रोजी अमित कुमार याने महिलेला सांगितले की, त्यांनी त्यांच्यासाठी एक गिफ्ट पाठवली आहे. ही गिफ्ट घेण्यासाठी त्यांना कोरियर कंपनीशी संपर्क साधावयास सांगण्यात आले. काही दिवसांनी दिल्लीस्थित कोरियर कंपनीतून फोन आला. त्यांनी सांगितले की, तुमच्यासाठी मँचेस्टरमधून गिफ्ट आली आहे. मात्र, ही गिफ्ट पाठवण्याच्या formalities पूर्ण करण्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, असे सांगण्यात आले. या विश्वासावरून त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बेत ₹३.३६ लाख जमा केले.

परंतु, बराच वेळ गेला तरी गिफ्ट आली नाही. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT