Planet Nine eSakal
विज्ञान-तंत्र

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

NTOs : नेपच्यूनच्या पलीकडे असणाऱ्या ट्रान्स-नेपच्युनियन ऑब्जेक्ट्सचं निरीक्षण कित्येक वर्षांपासून केलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Planet Nine in Solar System : नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार, आपल्या सूर्यमालेच्या बाहेर, दूर अंतराळात एक नवीन ग्रह असण्याची शक्यता पुढे आली आहे. या नव्या ग्रहाला 'प्लॅनेट नाईन' (Planet Nine) असे संबोधले जात असून, त्याच्या अस्तित्वाची पुष्टी करणारे नवे पुरावे सापडले आहेत. यामुळे २०१६ मध्ये Caltech च्या संशोधकांनी मांडलेल्या गृहीतकाला आता बळकटी मिळाली आहे.

आपल्या सूर्यमालेच्या बाहेर बर्फाळ खगोलीय पिंडांचा (ट्रांस-नेपच्यूनियन ऑब्जेक्ट्स - TNOs) एक पट्टा आहे. या पिंडांच्या वेगळ्या पद्धतीने फिरण्यावरून या नवीन ग्रहाचा शोध सुरू झाला. या पिंडांच्या फिरण्याच्या मार्गावर नेपच्यूनचा प्रभाव दिसून येतो. नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, आतापर्यंत आढळलेल्या कमी-कोनीय TNOs ची फिरण्याची पद्धतीही या नवीन ग्रहामुळेच असू शकते. कारण हे TNOs सूर्यापासून शेकडो पटीने दूर असतानाही सूर्याच्या अगदी जवळ येतात.

कशामुळे झाली खात्री?

नेपच्यूनच्या पलीकडे असणाऱ्या ट्रान्स-नेपच्युनियन ऑब्जेक्ट्सचं निरीक्षण कित्येक वर्षांपासून केलं जात आहे. या पट्ट्यावर नेपच्यून ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडून त्यांची दिशा बदलत असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं आहे. मात्र त्याही पलीकडे या TNOs वर आणखी एका गोष्टीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडत असल्याचं आता दिसलं आहे. म्हणजेच याठिकाणी एक नवा ग्रह असण्याची शक्यता वाढली आहे.

संशोधकांनी केलेल्या संगणन सिम्युलेशनमध्ये या नव्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे या भागातील गुरुत्वाकर्षण 'प्लॅनेट नाईन'च्या अस्तित्वाची शक्यता वाढवते. दक्षिण अमेरिकेतील चिली येथे येत्या दशकात सुरू होणाऱ्या वेरा रुबिन वेधशाळा या शोधाला आणखी गती देणार आहे. या वेधशाळेमुळे 'प्लॅनेट नाईन' शोधण्यात यश मिळू शकते. (Discovery of Planet Nine)

संशोधकांचे हे निष्कर्ष 'The Astrophysical Journal Letters' मध्ये लवकरच ले प्रकाशित होणार आहेत. आपल्या सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या अनेक रहस्याचा उलगडा 'प्लॅनेट नाईन' च्या शोधामुळे होऊ शकेल, अशी उत्सुकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT